'महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचं केंद्र, सरकारने राज्यांनाही पैसा द्यायलाच हवा'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 02:59 PM2020-05-16T14:59:55+5:302020-05-16T15:01:20+5:30

लॉकडाऊनमध्ये शेतकरी, मजुरांचे हाल होत आहेत, त्यांना कर्ज देणारं पॅकेज नको, त्यांच्या खिशात पैसा द्यायला हवा, लोक रस्त्यावर तहान-भुकेने चालत आहेत,

'Maharashtra is the center of the country's economy, the government must give money to the states' rahul gandhi | 'महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचं केंद्र, सरकारने राज्यांनाही पैसा द्यायलाच हवा'

'महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचं केंद्र, सरकारने राज्यांनाही पैसा द्यायलाच हवा'

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्यानं संक्रमितांची संख्यासुद्धा वाढतीच आहे. अनेक मजुरांनी लॉकडाऊन असल्यानं आपापल्या राज्यांचा मार्ग धरला आहे. परंतु, इतर राज्यांतून आपापल्या घरी जाण्यासाठी मजुरांना अतोनात हाल सहन करावे लागत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच मोदी सरकारने सर्वच राज्यांना पैसे द्यायला हवेत. महाराष्ट्राबद्दल बोलताना, महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेचं केंद्र आहे. त्यामुळे, केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला पैसे द्यायलाच हवेत. केंद्र सराकर हे मॅनेजमेंटच काम करत असून ऑपरेटचं काम राज्य सरकारचं असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलं. 

लॉकडाऊनमध्ये शेतकरी, मजुरांचे हाल होत आहेत, त्यांना कर्ज देणारं पॅकेज नको, त्यांच्या खिशात पैसा द्यायला हवा, लोक रस्त्यावर तहान-भुकेने चालत आहेत, त्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचं मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी व्यक्त केलं आहे. राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन देशातील कोरोना स्थिती आणि सरकारचं पॅकेज यावर भाष्य केलं. शेतकरी, मजुरांनी हा देश उभा केला आहे, त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. भारताच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करू नका, ते रेटिंग नंतर सुधारू शकेल, सध्या भारताच्या मजूर, शेतकऱ्यांच्या काळजीचा विषय, ते सध्या संकटात आहेत, त्यांना आधार द्या रेटिंग आपोआप सुधारेल, असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला हाणला आहे. 

महाराष्ट्र हे केवळ मोठं राज्य नसून युनिक स्टेट आहे. महाराष्ट्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेचं केंद्र आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात केंद्र सरकार जेवढा जास्त सपोर्ट राज्य सरकारला देईल, तेवढं चांगलं आहे. सर्व, राज्यांकडूनच हे डिलिव्हर होणर आहे. केंद्र सरकारचं काम हे व्यवस्थापनाचं काम असून राज्य सरकारचं काम ऑपरेशनचं आहे. त्यामुळे, लढाई लढण्याचं काम राज्य सरकारकडून होत आहे. म्हणून, राज्य सरकारला केंद्राने मदत, सहकार्य करणे आवश्यक असल्याच राहुल गांधींनी म्हटलं.  

दरम्यान, सध्या मजूर आणि शेतकऱ्यांना किमान तात्पुरता दिलासा आवश्यक आहे, त्यांच्या हातात रोख रक्कम देणं गरजेचे आहे. लॉकडाऊन समजुतीने आणि काळजी घेऊन उठवावा लागेल, दक्षतेने उठवायला हवा, हा कोणता इव्हेंट नाही, वृद्ध, व्याधीग्रस्तांची खबरदारी घेऊन लॉकडाऊन उठवावा लागेल, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी मागणी आणि पुरवठ्याचं गणित सुधारण्यासाठी गरिबांना पैसे देणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. लोकांच्या खिशात पैसा नसेल तर लोकं काय खाणार?, मागणी आणि पुरवठ्याचं गणित सुधारण्यासाठी पैसे देणं गरजेचं, पैसे राज्य सरकार अथवा केंद्र सरकारमार्फत द्या किंवा कसेही द्या, पण पैसे द्या, असंही राहुल गांधींनी मोदी सरकारला सांगितलं आहे. सरकारनं रेटिंग्स, जगातील प्रतिमेचा विचार आज करू नये, शेतकरी, मजूर, महिला, तरुण देशाचं रेटिंग्स बनवतात. सरकारने पॅकेजचा पुनर्विचार करावा, शेतकरी, मजुरांच्या खिशात पैसे द्यावेत, असंही राहुल गांधींनी सांगितलं आहे. 

We Will Win... लहान मुलाला घरी ठेऊन पत्नी रुग्णालयात तर पती मुंबई पोलिसात ऑन ड्युटी

Coronavirus : त्यांना कर्ज देणारं पॅकेज नको, तर खिशात पैसा द्या, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

 

Read in English

Web Title: 'Maharashtra is the center of the country's economy, the government must give money to the states' rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.