- हरीश गुप्तानवी दिल्ली : महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी भाजपने नियोजनपूर्वक योजना आखल्याची आणि तिची यशस्वी अंमलबजावणी केल्याची माहिती समोर आली आहे.राज्यपाल बी.एस. कोश्यारी यांनी मध्यरात्री राष्ट्रपती राजवट हटविण्याची शिफारस केली. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही शिफारस फॅक्स आणि ई-मेलच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे पाठविली. एक विशेष दूतही लगोलग राष्ट्रपती भवनात पाठविण्यात आला.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घटनेच्या अनुच्छेद ३५६ मधील कलम २ अन्वये स्वत:च्या अधिकारात राष्ट्रपती राजवट उठविण्याचा निर्णय घेतला. या कलमान्वये राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीची गरज राष्ट्रपतींना लागत नाही. ते स्वत: निर्णय घेऊ शकतात.
Maharashtra CM: महाराष्ट्रातील शपथविधीचा मार्ग असा झाला मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 3:39 AM