Maharashtra CM: 'सत्ता-स्थापनेत शरद पवारांचा हात', नवनीत कौर यांनी सांगितली अंदर की बात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 05:48 PM2019-11-23T17:48:14+5:302019-11-23T17:48:42+5:30

Maharashtra CM: राष्ट्रवादीने भाजपासोबत येऊन राज्यात सरकार स्थापन करावे, असे नवनीत कौर यांनी म्हटले होते.

Maharashtra CM: Sharad Pawar's hand in the establishment of power, Navneet Kaur told that inside story of ajit pawar | Maharashtra CM: 'सत्ता-स्थापनेत शरद पवारांचा हात', नवनीत कौर यांनी सांगितली अंदर की बात

Maharashtra CM: 'सत्ता-स्थापनेत शरद पवारांचा हात', नवनीत कौर यांनी सांगितली अंदर की बात

Next

मुंबई - महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. राज्यातील सत्तास्थापनेचे पडसाद दिल्लीत उमटू लागले आहेत. वार यांनी राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी दिल्लीतून आपली प्रतिक्रिया दिली असून नवीन सरकारचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिनंदन केलंय. तसेच, राज्यातील राजकीय घडामोडीमागे शरद पवारांचा हात असल्याचंही त्यांनी सूचवलंय. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार केंद्रस्थानी आले आहेत. 

राष्ट्रवादीने भाजपासोबत येऊन राज्यात सरकार स्थापन करावे, असे नवनीत कौर यांनी म्हटले होते. त्यानंतर, याविषयी पत्रकारांनी शरद पवारांना विचारले असता, कोण आहेत नवनीत कौर राणा? त्या आमच्या पार्टीचे धोरण ठरवणार का? असे सांगत शरद पवार यांनी नवनीत कौर राणा यांची शाळा घेतली. मात्र, नवनीत राणा कौर यांच्या मनातील इच्छेप्रमाणे सर्वकाही घडलंय. पण, शरद पवारांनी हे मला नजरअंदाज करून घडलंय, असे म्हटले आहे. त्यावर, नवनीत कौर यांनी आपलं मत मांडलय.  

''स्वप्न असतात, स्वप्नांना सत्यात उतरवण्याच सामर्थ्य देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं, मी पुन्हा येईन.... परंतु, या विधानावरुन त्यांना ट्रोल करण्यात आलं. पण, आज त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन पुन्हा येऊन दाखवलंय,'' असे खासदार नवनीत राणा कौर यांनी म्हटलंय. शिवसेनेच्या आजुबाजूच्या लोकांनीच बेईमानीची सुरुवात केली होती. पत्रकार परिषद घेऊन यांनीच सर्वांना शिवसेनेचे दरवाजे खुले असल्याचं म्हटलं होतं. मग, दरवाजे तुम्हालाच नाही, इतरांनाही खुले आहेत. शिवसेना फक्त बोलकेवडे आहेत, पण आम्ही यावर काम करुन दाखवलंय, असेही कौर यांनी म्हटलंय. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची विचारधारा वेगळी असून ते कधीच एकत्र येतील,असे वाटत नाही. यांच्या फक्त बैठका सुरु राहिल्या, बाकीच्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून उद्यापासून कामही सुरु करतील, असे कौर यांनी म्हटले. 

पवार नावाच्या पाठिमागेच सर्वकाही आहे, जे नाव पवार नाव आज भाजपासोबत जोडलं गेलंय. देशाच्या राजकारणात काहीही घडलं तर पवारसाहेबांच्या नावाशिवाय होत नाही, मग घरात होत असेल तर त्यांच्याशिवाय कसं? असा प्रश्न उपस्थित करत अजित पवारांच्या पाठिंब्याची पवारांना पूर्वकल्पना असल्याचं कौर यांनी सूचवलं आहे. तसेच, शरद पवार, अजित पवार, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. 
 

Web Title: Maharashtra CM: Sharad Pawar's hand in the establishment of power, Navneet Kaur told that inside story of ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.