शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

फडणवीसांची केंद्रात एन्ट्री! फक्त राज्यच नाही, मोदींनी दिली देशभराची जबाबदारी; राजकीय वजन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 2:31 PM

पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षनिष्ठेचं फळ मिळालं आहे. देवेंद्र फडणवीस यांना आता केंद्रात स्थान मिळालं आहे.

नवी दिल्ली- 

पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षनिष्ठेचं फळ मिळालं आहे. देवेंद्र फडणवीस यांना आता केंद्रात स्थान मिळालं आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज घोषणा झाली आहे. यात महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आलं आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीत सदस्य म्हणून फडणवीसांची वर्णी लागली आहे. 

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. यात देशभरातील भाजपाच्या १५ बड्या नेत्यांच्या समावेश करण्यात आला आहे. समितीच्या अध्यक्षपदी जेपी नड्डा आहेत. तर सदस्यपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, बीएस येडीयुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के.लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, भुपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथुर, श्रीमती वनथी श्रीनिवास यांचा समावेश आहे. तर बीएल संतोष हे सचिवपदी असणार आहेत. 

संसदीय समितीचीही घोषणाभाजपाच्या संसदीय समितीचीही आज घोषणा करण्यात आली. यात बीएस येडीयुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के.लक्ष्मण यांचा नव्यानं समावेश करण्यात आला आहे. तर भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा केंद्रीय संसदीय समितीच्या अध्यक्षपदी असणार आहेत. नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, बीएस येडीयुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के.लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया आणि बीएल संतोष (सचिव) यांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे संसदीय समितीतून यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वगळण्यात आलं आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा