- शीलेश शर्मानवी दिल्ली : महाराष्ट्रातील धक्कादायक राजकीय घडामोडींनंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना सूचना देऊन सर्व काँग्रेस आमदारांना एकजूट आणि सुरक्षित ठेवण्यास सांगितले, तसेच कोणत्याही परिस्थितीत फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सभागृहात कोसळायलाच हवे, असे निर्देश दिले. सोनिया गांधी यांनी अहमद पटेल यांना दूरध्वनीवरून या सूचना दिल्या. त्यानंतर अहमद पटेल यांनी सर्व काँग्रेस आमदारांना तातडीने जयपूरला रवाना करण्याची तयारी केली. शरद पवार यांच्या बाबतीतील शंकाकुशंकांना सोनिया गांधी यांनी दूर सारले आहे. त्यांनी सूचना दिल्या की, काँग्रेस नेत्यांकडून पवारांबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ नयेत. पवारांकडून मिळणाऱ्या सूचनांबरहुकूमच नेत्यांनी पावले उचलावीत.
काँग्रेस आमदार फुटू न देण्याच्या सोनिया गांधी यांच्या सक्त सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 3:22 AM