नवी दिल्ली : राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, या घटनाक्रमावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. लोकांनी दिलेल्या जनादेशाचा हा विश्वासघात असून, हे सरकार बेकायदेशीरपणे स्थापन करण्यात आल्याची टीकाही काँग्रेसने केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारला समर्थन दिल्यानंतर महिनाभरापासूनचा पेच अखेर समाप्त झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या चर्चेत सहभागी असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल म्हणाले की, ज्या प्रकारे घडामोडी रात्री झाल्या त्या लाजिरवाण्या आहेत. मुख्यमंत्र्यांना जेव्हा शपथ दिली गेली तेव्हा ना बँडबाजा होता ना मिरवणूक़काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी टष्ट्वीट केले आहे की, हा तर जनादेशाचा विश्वासघात आणि लोकशाहीची हत्या आहे. अजित पवार हे घोटाळ्यात सहभागी असल्याच्या मीडिया रिपोर्टलाही त्यांनी टॅग केले आहे. सत्तेची लालसा ही तत्त्व आणि भ्रष्टाचार यांना दूर करते. सुरजेवाला यांनी फडणवीस यांच्या सप्टेंबरमधील टष्ट्वीटचा उल्लेख केला आहे. यात फडणवीस म्हणाले होते की, राष्ट्रवादी कधीही सहयोगी असू शकत नाही. कारण, त्यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.काँग्रेस-राष्ट्रवादी-सेना सरकार स्थापन करणार : अहमद पटेलदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी ज्या पद्धतीने शपथ घेतली ती घटना राज्याच्या इतिहासात काळ्या शाईने लिहिली जाईल, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी या घटनाक्रमावर टीका केली आहे. संभाव्य आघाडी सरकार स्थापन करण्यास काँग्रेसने उशीर केल्याचा आरोपही पटेल यांनी फेटाळून लावला. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी-सेना सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, भाजपने कोडगेपणाच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. अर्थात, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आम्ही भाजपचा पराभव करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पटेल यांच्यासोबत सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणूगोपाल, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती.
Maharashtra Government: हा तर जनादेशाचा विश्वासघात, राज्यातील घडामोडींवर काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 3:55 AM