- नितीन अग्रवालनवी दिल्ली - महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत १३ जणांचा जीव घेणाऱ्या अवनी या नरभक्षी वाघिणीला महाराष्ट्र सरकारने बेकायदेशीररित्या ठार मारल्याचा गंभीर आरोप केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी केला व कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला.शार्प शूटर असगर अली याने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांच्या आदेशावरून अवनीच्या केलेल्या हत्येला मेनका गांधी यांनी पूर्णपणे बेकायदेशीर ठरवले. गांधी यांनी केलेल्या टिष्ट्वटमध्ये वाघिणीच्या हत्येचे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रामुख्याने उपस्थित केले आहे. गांधी म्हणाल्या की, वाघिणीला बेशुद्ध करून न पकडता थेट गोळी मारण्यात आली. वाघिणीच्या हत्येचे प्रकरण मी कायदेशीर, गुन्हेगारी व राजकीय प्रश्न म्हणून उपस्थित करील.या वाघिणीला यवतमाळ जिल्ह्यात दोन नोव्हेंबर रोजी गोळी घालून मारण्यात आले. गेल्या दोन वर्षांत अवनी १३ जणांच्या मृत्युला कारण ठरली. दहा महिन्यांपासून दोन बछड्यांची ती काळजी घेत होती. तिला राळेगाव हद्दीतील बोराटी जंगलात शूटर असगर अली याने गोळी घालून मारले. बेकायदा हत्या घडवण्यास असगर अली याचा वापर केला गेला, असे मेनका गांधी यांनी म्हटले. ज्या क्रूररितीने तिला ठार मारण्यात आले त्यामुळे मी खूप दु:खी आहे. अनेक पक्षांनी विरोध करूनही मुनगंटीवार यांनी तिला मारण्याचा आदेश दिला, असेही त्या म्हणाल्या.नाईलाजाने ठार केले‘अवनी’ वाघिणीला बेशुद्ध करून जिवंत पकडण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने वन कर्मचाºयांचा जीव वाचविण्यासाठी नाईलाजाने तिला ठार मारावे लागले. मंत्री आणि सचिव मुंबईत मंत्रालयात बसून वनांचे आणि वन्यजीवांचे रक्षण करत नाहीत. ते शेतकरी व अदिवासी करतात. त्यांच्यामध्ये खूप असंतोष होता. तो दूर केला नसता तर अखेरीस हेच लोक वन्यजीवांचे शत्रू झाले असते.-सुधीर मुनगंटीवार,वनमंत्री, महाराष्ट्र
महाराष्ट्र सरकारने केली ‘अवनी’ची बेकायदा हत्या, मनेका गांधींचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 6:59 AM