बेळगाव : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असणाऱ्या मराठीबहुल बेळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र एकीकरण समितीला एकही जागा मिळविता आली नाही. जिल्ह्यातील १८पैकी १० जागा भाजपाला, तर ८ जागी काँग्रेसला विजय मिळाला. २०१३च्या निवडणुकीत एकीकरण समितीचे दोन आमदार होते.कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी टिळकवाडी येथील राणी पार्वती देवी कॉलेजमध्ये झाली. महाराष्टÑ एकीकरण समितीचा गड समजल्या जाणाºया बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण व खानापूर या चारही मतदारसंघांत एकीकरण समितीचे उमेदवार पराभूत झाले. या चार जागापैकी काँग्रेस - भाजपाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. खानापूर वगळता समितीच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.बेळगाव जिल्ह्यातील विजयी उमेदवार :भाजपा : अभय पाटील (बेळगाव दक्षिण), अनिल बेनके (बेळगाव उत्तर), दुर्योधन ऐहोळे (रायबाग), पी. राजीव (कुडची), शशिकला ज्वोल्ले (निपाणी), महांतेश दोड्डगौडर (कित्तूर), उमेश कत्ती (हुक्केरी), भालचंद्र जारकीहोळी (अरभावी), आनंद मामनी (सौंदत्ती), महादेवअप्पा यादवाड (रामदुर्ग). काँग्रेस : लक्ष्मी हेब्बाळकर (बेळगाव ग्रामीण), डॉ. अंजली निंबाळकर (खानापूर), महेश कुमठळ्ळी (अथणी), श्रीमंत पाटील (कागवाड), गणेश हुक्केरी (चिक्कोडी), सतीश जारकीहोळी (यमकणमर्डी), महांतेश कौजलगी (बैलहोंगल), रमेश जारकीहोळी (गोकाक).>डॉ. अंजली निंबाळकर विजयीखानापूर मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या डॉ. अंजली हेमंत निंबाळकर या निवडून आल्या. त्यांनी भाजपाच्या विठ्ठल हलगेकर यांचा पाच हजार १३३ मतांनी पराभव केला. निंबाळकर यांना ३६,६४९, भाजपाचे विठ्ठल हलगेकर यांना ३१५१६, जनता दलाच्या नाशीर बागवान यांना २७२७२, एकीकरण समितीच्या अरविंद पाटील यांना २६,६१३, तर समितीचे बंडखोर विलास बेळगावकर यांना १७,८५१ मते पडली. अंजली या कर्नाटकचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या त्या नातेवाईक आहेत.
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 5:36 AM