नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सुरू असलेल्या सीमाप्रश्नाने मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक घेतली. या बैठकीत सकारात्कम चर्चा झाली असून, दोन्ही राज्यांनी एकमेकांच्या राज्यांवर अधिकार गाजवणार नसल्याचे मान्य केले आहे. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री उपस्थित होते.
बैठकीत सकारात्कम चर्चाबैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सुरू झालेला सीमावाद मिटवण्यासाठी आणि सैंविधानिक मार्ग शोधण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. दोन्ही राज्यांच्या नेत्यांसोबत सकारात्कम चर्चा झाली असून, दोन्ही राज्यांनी काही गोष्टी मान्य केल्या आहेत. बैठकीत काही निर्णय झाले आहेत, त्यानुसार सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोणतेच राज्य दुसऱ्या राज्यावर दावा सांगणार नाही. याशिवाय, दोन्ही राज्यांकडून तीन-तीन बैठक घेऊन योग्य मार्ग काढतील.
तीन-तीन मंत्री बैठका घेतीलशहा पुढे म्हणाले की, याशिवाय, काही छोटे-मोठे मुद्दे आहेत, याबाबतही हेच मंत्री निर्णय घेतील. दोन्ही राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ठिक राहावी. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली कमिटी बनवण्यासाठी सहमत झाली आहे. ही कमिटी कायदा-व्यवस्थेवर ताबा ठेवण्याचं काम करेल. सीमावादादरम्यान, काही फेक ट्विटद्वारे चुकीची माहिती प्रसारित करण्यात आली आहे. त्याची चौकशी होणार आणि गुन्हेगारांना योग्य शिक्षा दिली जाईल.
विरोधकांना आवाहनदोन्ही राज्यांच्या विरोधी पक्षांनाही आवाहन आहे की, राजकीय विरोध वेगळा आहे, पण राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी या सीमावादाला राजकीय मुद्दा बनवू नये. कमिटीची रिपोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहावी. मला विश्वास आहे की, दोन्ही राज्यामध्ये काँग्रेस, एनसीपी आणि उद्धव ठाकरेंचा गट सहयोग करेल आणि याला राजकीय मुद्द बनवणार नाही, अशी अपेक्षा शहा यांनी यावेळी व्यक्त केली.