शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

लसीकरण अभियानात उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र आघाडीवर, महाराष्ट्रात सात लाखांवर कोरोना योद्ध्यांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 3:49 AM

vaccination : कोरोनाविरोधात लढणाऱ्या देशभरातील ८८ लाख ५७ हजार ३४१ कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात ७ लाख ४० हजार ८३१ (८.२ टक्के) कोरोना योद्ध्यांचे लसीकरण झाले आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाविरोधात लढणाऱ्या देशभरातील ८८ लाख ५७ हजार ३४१ कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आली आहे. यातील १ लाख ३४ हजार ६९१ लसी या मंगळवारी लावण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लसीकरण अभियानात उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत ९ लाख ३४ हजार ९६२ (१०.४ टक्के) लसीकरण करण्यात आले. गेल्या २४ तासांमध्ये ११ हजार ६१० कोरोनाबाधित आढळले, तर १०० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दिलासादायक बाब म्हणजे ११ हजार ८३३ कोरोना रुग्णांनी संसर्गावर मात केली. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या त्यामुळे १ कोटी ९ लाख ३७ हजार ३२० झाली आहे. यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार ८५८ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत, तर १ लाख ३६ हजार ५४९ सक्रिय रुग्णांवर (१.२५ टक्के) उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत १ लाख ५५ हजार ९१३ (१.४३ टक्के) रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. बुधवारी देशाचा कोरोनामुक्ती दर ९७.३३ टक्के नोंदवण्यात आला आहे. गेल्या एका दिवसात सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत ३२३ ची किरकोळ घट नोंदवण्यात आली आहे. केरळमध्ये सर्वाधिक ४ हजार ९३७ कोरोनाबाधित आढळले, तर महाराष्ट्रात ३ हजार ६६३ कोरोनाबाधितांची भर पडली. दरम्यान, महाराष्ट्र ३९, केरळ १८, तामिळनाडू ७ तसेच कर्नाटकमध्ये ६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. देशात आतापर्यंत २० कोटी ७९ लाख ७७ हजार २२९ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ६ लाख ४४ हजार ९३१ तपासण्या मंगळवारी करण्यात आल्यात. 

देशात ११,६१० नवे रुग्ण; मृत्युदरात घट- देशात कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या १ कोटी ६ लाख ४४ हजारांपेक्षा जास्त झाली असून त्यांचे प्रमाण ९७.३३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होत असून त्यांचे प्रमाण अवघे सव्वा टक्के आहे. कोरोनाच्या रुग्णांचा मृत्युदर १.४३ टक्के झाला आहे. - बुधवारी कोरोनाचे ११,६१० नवे रुग्ण सापडले व १०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून बळींची एकूण संख्या १,५५,९१३ झाली आहे. - देशात कोरोनाचे १,३६,५४९ उपचाराधीन रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची संख्या १०९३७३२० असून त्यापैकी १०६४४८५८ जण बरे झाले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या