"देशामध्ये रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा असताना सूरतमधील भाजपाच्या कार्यालयात हेच औषध मोफत वाटले जात आहे हे राजकारण नाही तर काय आहे?," असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी ट्वीट करुन भाजपाच्या गुजरातमधील रेमडेसिवीर मोफत वाटपावर सवाल उपस्थित केला आहे. "देशात रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे आणि सूरतमधील भाजप कार्यालयात ते मोफत वाटण्यात येत आहे. हा राजकीय तुटवडा आहे का?," असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा प्रश्न विचारला आहे.
"रेमडेसिवीरचा तुटवडा आणि भाजप कार्यालयात मोफत वाटले जातेय; हे राजकारण नाही तर काय?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 11:41 IST
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा सवाल, सध्या देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात आहे तुटवडा
रेमडेसिवीरचा तुटवडा आणि भाजप कार्यालयात मोफत वाटले जातेय; हे राजकारण नाही तर काय?
ठळक मुद्देसध्या देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात आहे तुटवडाअनेक ठिकाणी लोकांना इंजेक्शनसाठी करावा लागत आहे संघर्ष