नवी दिल्ली : कोरोनासारख्या अभूतपूर्व संकटातही आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणाऱ्या देशातील दहा सर्वोत्तम पोलीस ठाण्यांची यादी गुरुवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली. त्यात मणिपुरातील नाँगपोक सेकमाई या पोलीस ठाण्याने पहिला क्रमांक पटकावला. तामिळनाडूतील एडब्ल्यूपीएस-सुरमंगलम आणि अरुणाचल प्रदेशातील खारसांग ही ठाणे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मात्र, महाराष्ट्रातील एकाही ठाण्याचा समावेश नाही.
१६,६७१ पोलीस ठाण्यांच्या सर्वेक्षणातून केंद्रीय गृह मंत्रालयाने यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम दहा पोलीस ठाण्यांची निवड केली.
काय होते निकष?डेटा विश्लेषण, थेट निरीक्षण व लोकांची मते या तीन सूत्रांच्या आधारावर दहा पोलीस ठाण्यांची निवड करण्यात आल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
कुठून आली संकल्पना?२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छ येथे पोलीस महासंचालकांच्या परिषदेत सर्वोत्तम पोलीस ठाण्यांच्या निवडीची संकल्पना मांडली होती. त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली होती. त्या निकषांची पूर्तता करणाऱ्या ठाण्यांना दहामध्ये स्थान मिळते.
सर्वोत्तम दहा पोलीस ठाणे१. नाँगपोक सेकमाई (मणिपूर)२. एडब्ल्यू पीएस - सुरमंगलम (तामिळनाडू)३. खारसांग (अरुणाचल प्रदेश)४. झिलमिली (छत्तीसगढ)५. सानगाव (गोवा)६. कालीघाट (अंदमान-निकोबार)७. पॅकाँग (सिक्कीम)८. कांत (उत्तर प्रदेश)९. खानवेल (दादरा-नगरहवेली)१०. जम्मीकुंटा (तेलंगण)