शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

बंडखोर आमदारांची पहिली पसंत 'भाजप', 5 वर्षांत तब्बल 182 जणांनी घेतलीय शरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 7:36 PM

Maharashtra Political Crisis: खरे तर सध्या भाजप ही बंडखोर आमदारांची पहिली पसंती झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 5 वर्षांत जवळपास 405 आमदारांनी पक्ष सोडला आहे. यांपैकी ४५ टक्के आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

आधी कर्नाटकात, नंतर मध्य प्रदेशात आणि आता महाराष्ट्रामध्ये आमदारांच्या बंडखोरीचा खेळ सुरू झाला आहे. शिवसेनेचे मातब्बर मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाकरे सरकारमधील अनेक आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे, जे कर्नाटक आणि मध्य प्रदेशात घडले, तेच महाराष्ट्रात घडले तर उद्धव यांचे सरकारही पडेल.

महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण २८८ जागा आहेत. मात्र, एका आमदाराच्या निधनामुळे एक जागा रिक्त झाली आहे. यामुळे आता महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 287 आमदार आहेत. यामुळे आता सरकार स्थापनेसाठी अथवा टिकवण्यासाठी एकूण 144 आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. सध्या महाविकास आघाडीकडे एकूण 153 आमदार आहेत. यांपैकी शिवसेने कडे 55, राष्ट्रवादीकडे 53 तर काँग्रेसचे 44 आमदारांचे बलाबल आहे. पण, मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे 46 हून अधिक आमदार असल्याचा मोठा दावा केला आहे. यामुळे उद्धव ठाकरे सरकारवर टांगती तलवार दिसत आहे. एकनाथ शिंदे म्हणत असलेले आमदार भाजपच्या बाजूला गेले तर महाराष्ट्रात पुन्हा भाजपचेच सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

बंडखोर आमदारांची पहिली पसंत भाजप -खरे तर सध्या भाजप ही बंडखोर आमदारांची पहिली पसंती झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 5 वर्षांत जवळपास 405 आमदारांनी पक्ष सोडला आहे. यांपैकी ४५ टक्के आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ही आकडेवारी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सची (ADR) आहे. यात 2016 ते 2020 या पाच वर्षांच्याकाळात पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलेल्या आमदारांचे विश्लेषण करण्यात आले आहे. हा एडीआर रिपोर्ट गेल्या वर्षी मार्चमध्ये आला आहे.

बंडखोरीचा सर्वाधिक फायदा भाजपला - मार्च 2021 च्या ADR अहवालामध्ये म्हणण्यात आले आहे,की  आहे की, 2016 ते 2020 दरम्यान देशभरातील विधानसभेतील 405 आमदारांनी पक्ष सोडला. यांपैकी 182 म्हणजेच एकूण 45 टक्के आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. 

या अहवालानुसार, पक्ष सोडून गेलेल्या 38 म्हणजे 9.4% आमदार काँग्रेसशी संबंधित होते. तर, 25 आमदार तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये आणि 16 आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याशिवाय, नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये 16, जेडीयूमध्ये 14, तर बसपा आणि टीडीपीमध्ये प्रत्येकी 11 आमदार सामील झाले आहेत.

बंडखोरीचा सर्वात मोठा फटका काँग्रेसला -बंडखोरीचा सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. पाच वर्षांत काँग्रेसच्या तब्बल 170 आमदारांनी पक्ष सोडला. तर भाजपच्या 18 आमदारांनी पक्ष सोडला आहे. याशिवाय, बसप आणि टीडीपीच्या 17-17 आमदारांनी पक्ष सोडला. महत्वाचे म्हणजे या 5 वर्षांच्या काळात शिवसेनेच्या एकही आमदाराने पक्ष सोडला नव्हता.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकMadhya Pradeshमध्य प्रदेश