- हरीश गुप्तानवी दिल्ली : प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेत (पीएमआरपीवाय) महाराष्ट्रातील जवळपास अकरा लाखांहून अधिक लोकांना लाभ मिळाला असून, देशभरात या योजनेच्या लाभार्थींची संख्या ६१ लाख आहे. यात महाराष्ट्र ११,०६,०८७ लाभर्थ्यांसह अग्रस्थानी आहे.२०१६-१७ मध्ये कामगार आणि रोजगार मंत्रालयाने विविध क्षेत्रांतील कंपन्या आणि सेवायोजकांना नवीन नोकरभरती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केली होती. या योजनेत नवीन कर्मचाऱ्यांना रोजगार देणा-या सर्व कंपन्यांचे कर्मचारी भविष्य निर्वाह योजना (ईपीएस) आणि कर्मचारी भविष्य निधीतील (ईपीएफ) योगदान ( १२ टक्के किंवा अनुज्ञेय) सरकारी तिजोरीतून देण्याची ही योजना आहे. सर्व पात्र कंपन्या/सेवायोजक/नियोक्त्यांसाठी तीन वर्षे ही योजना लागू आहे. आॅगस्ट २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेतहत २६ जुलै २०१८ पर्यंत ६१ लाख १२ हजार ५२७ जणांना लाभ मिळाला आहे. मेक इन इंडिया आणि सरकारच्या अन्य योजनांसाठी पूरक म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती. विशेष सेवा, वस्त्रोद्योग, तयार कपडे, स्वच्छता, साफ-सफाई, इस्पितळ आणि हिºयांना पैलू पाडणे आदी क्षेत्रातील आस्थापनांचा या योजनेत समावेश आहे. जवळपास २५ क्षेत्रांचा या योजनेत समावेश आहे. या योजनेच्या लाभार्थींच्या संख्येत महाराष्टÑ देशात अग्रणी असून, गोवा शेवटच्या स्थानी आहे, अशी माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयाने राज्यसभेत काँग्रेसचे कपिल सिबल यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्नाला दिलेल्या उत्तरात दिली.प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेचे राज्यनिहाय लाभार्थीराज्य - लाभार्थीमहाराष्ट्र ११०६०८७तामिळनाडू ७१००८८कर्नाटक ५६९४३३गुजरात ५६०८५३हरियाणा ५१२३१७आंध्र प्रदेश ४८८८६९उत्तर प्रदेश ४४१९४५दिल्ली ३७११२२राजस्थान २३३३३१मध्यप्रदेश १८१८२५पश्चिम बंगाल १७८३९२उत्तराखंड १५९०९७केरळ १०८८१३पंजाब १०६७६६चंदीगड ८३०७३हिमाचल प्रदेश ७२७४०बिहार ७२९७०ओडिशा ६६९४७छत्तीसगढ ५९१६४झारखंड १९५७८आसाम ५०८३गोवा ४९३४एकूण ६११२५२७(तेलंगणासह)
रोजगारनिर्मितीत महाराष्ट्र अव्वल; देशभरात लाभार्थींची संख्या ६१ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 6:10 AM