शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जीएसटीची सर्वाधिक चोरी महाराष्ट्रात, मुंबई अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 5:25 AM

औद्योगिक आणि व्यावसायिक राज्य महाराष्ट्र जीएसटी (वस्तू व सेवा) करचोरी प्रकरणातही अग्रेसर असल्याचे समोर आले आहे.

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : औद्योगिक आणि व्यावसायिक राज्य महाराष्ट्रजीएसटी (वस्तू व सेवा) करचोरी प्रकरणातही अग्रेसर असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी १ जुलै रोजी लागू करण्यात आलेल्या जीएसटी प्रणालीत राज्यात ५९४ कोटी रुपयांपेक्षा अधिक करचोरीची प्रकरणे पकडली गेली.राज्यातील तीन जीएसटी विभागांनी करचोरीची एकूण १४७ प्रकरणे पकडली. ५९४.२७ कोटींची करचोरी झाली आहे. यात मुंबई विभागात सर्वाधिक १०४ प्रकरणांत ४९४.७३ कोटी, नागपूर विभागात ३० प्रकरणांत ८७.९२ कोटी आणि पुणे विभागात १३ प्रकरणांत ११.६२ कोटी रुपयांची करचोरी पकडण्यात आली आहे. एकूण चार व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. देशात जीएसटी चोरीच्या पकडण्यात आलेल्या एकूण १२०५ प्रकरणांत ३०२६.५५ कोटी रुपयांची चोरी पकडण्यात आली. करचोरी प्रकरणात सर्वाधिक संख्या पंचकुला विभागात येणाऱ्या हरियाणात आहे. येथे एकूण १४८ प्रकरणे पकडण्यात आले. यात ८४.८९ कोटी रुपयांची कर चोरी पकडण्यात आली. १०८ प्रकरणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील अहमदाबादेत आहेत. यात ९७.३५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. महाराष्ट्रानंतर अधिक रकमेच्या बाबतीत उत्तरप्रदेश आणि कर्नाटकचा क्रमांक आहे. उत्तर प्रदेशात ३४ प्रकरणात १५४.२३ कोटी रुपये आणि कर्नाटकात २८ प्रकरणात जवळपास १०४ कोटी रुपयांची कर चोरी पकडण्यात आली आहे. देशभरात एकूण १७ लोकांना या प्रकरणात दंड करण्यात आला. यातील ९ जणांना आर्थिक वर्ष २०१७-१८ आणि उर्वरित ८ जणांना चालू आर्थिक वर्षात शिक्षा देण्यात आली. मध्यप्रदेशात ७ जणांवर ५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

महाराष्ट्रात वाढली करवसुलीजीएसटी लागू झाल्यानंतर महाराष्ट्रात अप्रत्यक्ष करात मोठी वाढ झाली आहे. वर्ष २०१६-१७ च्या ९०५२५ कोटींच्या तुलनेत २०१७-१८ मध्ये १,१५,९४० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर जमा झाला आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास ४० टक्के अधिक कर जमा झाला आहे. यावर्षी एप्रिल ते जूनच्या दरम्यान जीएसटीच्या स्वरुपात ३५,९१५ कोटी रुपये जमा झाले आहेत. मात्र, जीएसटी लागू होण्यापूर्वी याच काळात २५,७४२ कोटी रुपये व्हॅटच्या स्वरुपात मिळाले होते.

चोरी पकडण्यासाठी विश्लेषणअर्थ मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, कर चोरीचे प्रकरणे पकडण्यासाठी विश्लेषण व जोखिम व्यवस्थापन महासंचालनालयाची (डीजीएआरएम) स्थापना करण्यात आली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाअंतर्गत काम करणारे डीजीएआरएमचे अधिकारी करदात्यांकडून प्राप्त सूचनांचे विश्लेषण करुन चोरीच्या प्रकरणांची निश्चिती करतात. विश्लेषणातून मिळालेल्या आकड्यांच्या आधारावर जीएसटी व्यवस्थेला अधिक चांगले करण्यासाठी व महसूलामध्ये वाढ करण्यासाठी धोरणात सुधारणा केली जाते.

दोन व्यावसायिकांना दिल्लीत अटकदिल्लीतील रोहिणीस्थित दोन व्यावसायिकांना एक आॅगस्ट रोजी केंद्रीय (वस्तू आणि सेवा कर) जीएसटी (पश्चिम दिल्ली) आयुक्तालयाने अटक केली. या दोघांनी प्रत्यक्ष मालाचा पुरवठा न करता इनपुट टॅक्स क्रेडीट इन्व्हायसेस दिल्याबद्दल त्यांना ही अटक झाली. प्लास्टीक ग्रॅन्युएल उद्योगाशी संबंधित ही अंदाजे २०१ कोटी रूपयांची करचुकवेगिरी आहे.अनेक ठिकाणी झडत्या घेण्यात आल्या त्यात गुन्ह्याशी संबंधित अनेक कागदपत्रे व पुरावे हाती लागले. असे बनावट इन्व्हायसेस देण्यासाठी या व्यावसायिकांनी अनेक संस्थांची स्थापना केल्याचे तपासात उघड झाले. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायद्याचे (२०१७) कलम ६९ (१) अन्वये त्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना पतियाला हाऊस येथील महानगर दंडाधिकाºयांपुढे उभे करण्यात आले. तपास सुरू असून आणखी मोठ्या प्रमाणात कर चुकवल्याचे उघड होऊ शकते. तपास सुरू असून आणखी अनेक बनावट कंपन्यांचीशक्यता अधिकाºयांनी बोलून दाखवली.

टॅग्स :GSTजीएसटीMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई