Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नांची आज साऱ्यांनाच उत्तरे मिळाली. विधानसभेत महायुती की महाआघाडी? यावर आज निकाल आला. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीने २०० पार मजल मारून थेट बहुमताचा आकडा गाठला. तर काँग्रेस-ठाकरे गट-शरद पवार गट महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. मविआला जेमतेम पन्नाशी गाठता आली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरु झाली होती. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास अशी टफ-फाईट दिसून येईल, असे तज्ज्ञांसह एक्झिट पोल्सचा अंदाज होता. मात्र मतमोजणी सुरु होऊन अवघ्या काही तासांतच भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीने आधी शंभरी पार केली, मग बहुमताचा आकडा ओलांडला आणि अखेर २०० पार मजल मारली. महायुतीच्या या विजयाने आगामी बिहार विधानसभेच्या निवडणुकीची पायाभरणी केली, असे मत केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी व्यक्त केला.
"महाराष्ट्रात प्रचंड बहुमताच्या जोरावर भाजपा महायुतीचे सरकार पुन्हा एकदा विजयी झाले आहे. हा बाब खूपच मोठा आणि ऐतिहासिक विजय आहे. महाराष्ट्रात विभिन्न प्रकारचे नॅरेटिव्ह सेट केले जात होते, विविध धारणा बनवण्याचा प्रयत्न केला जात होता, या सगळ्याचा मतदार जनतेने उत्तर दिले आहे. बिहारमधील विरोधी पक्षाचे नेतेमंडळी म्हणत होते की महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल. तसेच झारखंडमध्ये छत्राची जागा जिंकून आमच्या पक्षाने विजयी सुरुवात केली आहे. पोटनिवडणुकांमध्ये अनेक बडी मंडळी पराभूत झाली. या विविध विजयांमुळे बिहारच्या आगामी २०२५ विधानसभा निवडणुकीची पायाभरणी केली," अशा शब्दांत केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरु झाली. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत असल्याने निकालात टफ-फाईट दिसून येईल, असे तज्ज्ञांसह एक्झिट पोल्सचा अंदाज होता. मात्र मतमोजणी सुरु होऊन अवघ्या काही तासांतच भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीने आधी शंभरी पार केली, मग बहुमताचा आकडा ओलांडला आणि अखेर २०० पार मजल मारली. काँग्रेस-ठाकरे गट-श.पवार गटाच्या महाविकास आघाडीला मात्र अर्धशतक गाठतानाही दमछाक झाली.