शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

चलनी नोटावर उमटणार महाराष्ट्र!

By admin | Published: August 27, 2015 4:23 AM

दहा, शंभर, पाचशे व एक हजारांच्या चलनी नोटांवर आता महाराष्ट्र दिसणार आहे. अजिंठा- वेरूळ व एलिफंटा लेण्या, मुंबईचे छत्रपती शिवाजी टर्मिनस, कास पठार, कोयना वन्यजीव

- रघुनाथ पांडे,  नवी दिल्लीदहा, शंभर, पाचशे व एक हजारांच्या चलनी नोटांवर आता महाराष्ट्र दिसणार आहे. अजिंठा- वेरूळ व एलिफंटा लेण्या, मुंबईचे छत्रपती शिवाजी टर्मिनस, कास पठार, कोयना वन्यजीव अभयारण्य, चंदोली राष्ट्रीय उद्यान व राधानगरी वन्यजीव अभयारण्याचे चित्र नोटांवर उमटलेले पाहायला मिळेल. दिवाळीदरम्यान हा बदल होणार असून, जागतिक वारसा असणाऱ्या देशातील ३० स्थळांच्या चित्रांची छपाई नोटांवर होईल. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेला नोटांच्या नव्या डिझाईनमध्ये भारतातील जागतिक वारसा सांगणाऱ्या स्थळांचा समावेश करण्यासाठी परवानगी दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नोटांच्या नव्या मालिकेत महाराष्ट्रातीलही स्थळांची छपाई होईल.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले की, १९ जून २०१५ रोजी याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला असून, भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटांच्या सुरक्षेबाबत बी- क्वालिफिकेशन बीड (पीक्यूबी) जारी केली आहे. नोटांची नवी मालिका अधिक सुरक्षित व प्रगत राहण्यासाठी केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला काही सूचना केल्या असून बँकेने त्यावर कामही सुरू केले आहे. युनेस्कोने जागतिक वारसा स्थानांच्या यादीत भारतातील ज्या ३० स्थळांचा समावेश केला आहे, त्यात सहा नैसर्गिक, तर २४ सांस्कृतिक स्थळे आहेत. १ जुलै २०१२ रोजी पश्चिम घाटास समाविष्ट करण्यात आले असल्याने कास पठार, कोयना वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान व राधानगरी वन्यजीव अभयारण्य आता जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.