महाशिवरात्री - जोड - जोड
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM
सर्व मानव सेवा संघ
सर्व मानव सेवा संघमहाशिवरात्रीनिमित्त सर्व मानव सेवा संघाच्यावतीने गंगाबाई घाटावर आयोजित महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्त येणाऱ्या भाविकांना प्रसादाच्या स्वरूपात एक हजार लिटर दही वितरित करण्यात आले. या उपक्रमाला आशिष वाजपेयी, विजय अग्रवाल, मोनु पाठक, मनोज बेताला, अनिल उगले, आशा बोरकर, दिनेश येवले, मनोहर केळवदे, ज्ञानेश्वर निमजे, सीमा वासनिक, कल्पना रंगारी, वसिम भाई आदींचे सहकार्य लाभले. नारा दहन घाटमहाशिवरात्रीनिमित्त नारा घाटावर महादेवाच्या पूजेसाठी भाविकांनी गर्दी केली होती. घाटावर सदैव असलेली दु:खाची छटा, धार्मिक वातावरणामुळे पुसट झाली होती. महिला व बालकांनाही घाटावर येऊन महादेवाचे दर्शन घेतले. अनेकांनी अभिषेक केला. महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात रवि शेलारे, महेंद्र बोरकर, सुषमा चौधरी, सुरेश जग्यासी, हेमराज वादले आदींचे सहकार्य लाभले. महानगर छात्र सेनामहानगर छात्र सेनेतर्फे महाशिवरात्रीनिमित्त गंगाबाई घाटावरील भगवान शिवचा नाना झोडे यांनी अभिषेक केला. महाशिवरात्रीला शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला होता, अशी आख्यायिका आहे. त्यानुसार छात्र सेनेतर्फे शिवशंकराच्या मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी मनीष चहांदे, प्रवीण शिल्लोर, अजय शिल्लोर आदी कार्यकर्ता उपस्थित होते.