नवी दिल्ली : महात्मा गांधींचा भारत हवा आहे की नथुराम गोडसेचा भारत हे ठरविण्याची वेळ आता आली आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. गांधीजींच्या भारतात प्रेमाची भावना आहे तर गोडसेच्या भारत विद्वेषाने ग्रासलेला आहे असेही ते म्हणाले.लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी दिल्लीतील बुथ कार्यकर्त्यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. राफेल विमाने खरेदी व्यवहार, डोकलाम, रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करण्यात आलेले अपयश, राष्ट्रीय सुरक्षा अशा अनेक मुद्द्यांवरून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. ‘मसूद अजहरजी' उल्लेखावरून खडाजंगीराहुल गांधी म्हणाले की, पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मदने (जेईएम) १४ फेब्रुवारी रोजी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले. या हल्ल्याचा सूत्रधार व जेईएमचा प्रमुख मसूद अजहर याला भाजपाच्या सरकारनेच तुरुंगातून मुक्त केले होते. मसूद अजहरजी असा उपरोधिक उल्लेख करत ते म्हणाले की, त्याला अजित डोवालइण हेच विमानातून कंदाहार येथे घेऊन गेले व तिथे त्याच्या साथीदारांकडे सुपूर्द केले. ५६ इंची छाती असलेल्या लोकांनीच ही कृत्ये केली आहेत. ‘मसूद अजहरजी' अशा उल्लेखाबद्दल भाजपाने राहुल गांधींवर टीका केली.
महात्मा गांधी यांचा भारत हवा की गोडसेचा?- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 6:36 AM