भारतातील दिग्गज उद्योजक आणि महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख (Mahindra and Mahindra) आनंद महिंद्रा यांनी महाराष्ट्र सरकारकडे एक मागणी केली आहे. राज्यात गरजेनुसार लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. "देशात अर्ध्यापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. हे राज्य देश आणि आर्थिक घडामोडींचं केंद्र आहे. सारखं सारखं लॉकडाऊन लावल्यानं आर्थिक स्थिती अधिक खालावेल. यावेळी करोना लसीच्या आपात्कालिन वापराची गरज आहे. जेणेकरून हे संक्रमण कमीतकमी लोकांमध्ये पसरेल," असं महिंद्रा म्हणाले.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत होतेय वाढ; आनंद महिंद्रांनी दिला सल्ला, म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 12:03 PM
Anand Mahindra : सातत्यानं लॉकडाऊन लावत गेलो तर त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतील असंही महिंद्रांनी म्हटलं आहे.
ठळक मुद्देसातत्यानं लॉकडाऊन लावत गेलो तर त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतील असंही महिंद्रांनी म्हटलं आहे.गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या