शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

ट्रोलनंतर मेल, एक्स्प्रेसमध्ये ‘मसाज’चा प्रस्ताव मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 4:16 AM

मसाजची सुविधा पुरविणे अशोभनीय असल्याने, या विरोधात महिला संघटनांनी विरोध दर्शविला. परिणामी, पश्चिम रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेसमधील मसाजसेवेचा प्रस्ताव रद्द केला.

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागाने महसूलवाढीसाठी ‘मसाज’ सुविधा मेल, एक्स्प्रेसमध्ये सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डात दिला होता. मात्र, या सेवेला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. मसाजची सुविधा पुरविणे अशोभनीय असल्याने, या विरोधात महिला संघटनांनी विरोध दर्शविला. परिणामी, पश्चिम रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेसमधील मसाजसेवेचा प्रस्ताव रद्द केला.रतलाम विभागामधील इंदूर स्थानकातून सुटणाऱ्या ३९ मेल, एक्स्प्रेसमध्ये मसाज सुविधा अंमलात आणण्याचा प्रस्ताव होता. यामध्ये डेहराडून-इंदूर एक्स्प्रेस, नवी दिल्ली-इंदूर इंटरसिटी एक्स्प्रेस आणि अमृतसर एक्स्प्रेस या रेल्वेमध्ये मसाजची सुविधा पुरविण्यात येणार होती.याद्वारे २० लाख रुपये आणि मसाजसेवा पुरविणाºया व्यक्तींच्या तिकिटांद्वारे ९० लाख रुपयांचा अतिरिक्त महमूल मिळण्याचा उद्देश होता. मात्र, ही माहिती सोशल मीडियावरून प्रसारित झाल्यानंतर युजर्सनी भारतीय रेल्वे, पश्चिम रेल्वे प्रशासनाला ट्रोल केले. मसाजसेवेच्या प्रस्तावाच्या विरोधात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी अनेकांनी पत्रव्यवहार केला.प्रवाशांच्या सूचनेप्रमाणे मसाजसेवेचा निर्णय रद्द केला आहे. प्रवाशांनी दिलेल्या सूचना, उपाययोजना, तक्रारी यावर काम केले जाणार आहे. पश्चिम रेल्वे प्रशासन प्रवासांना आरामदायी, सुरक्षित प्रवास अधिक चांगल्या प्रकारे देण्यास तत्पर राहील, असे पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.अशी होती सुविधामसाजसाठी सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत वेळ होती. प्रत्येक रेल्वेत मसाज करणाºयांसाठी पाच कर्मचारी नेमण्यात येणार होते. मसाजचे प्रकार तीन गटांत विभागले होते. गोल्डमध्ये १०० रुपयांत आॅलिव्ह तेल किंवा चिकट होत नसलेल्या तेलाने मसाज केला जाणार होता. डायमंडमध्ये २०० रुपयांत सुगंधी तेलाने आणि प्लॅटिनममध्ये ३०० रुपयांत क्रीमद्वारे मसाज केला जाणार होता.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे