शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहोचवणं हे आमच्यासमोरील मुख्य आव्हान : अदर पुनावाला

By जयदीप दाभोळकर | Published: January 12, 2021 4:14 PM

अन्य देशांकडूनही मागणी, भारतीयांना प्राधान्य; देशात लसीतून नफा मिळवणार नाही, पुनावाला यांचं वक्तव्य

ठळक मुद्देमहिन्याला ७ ते ८ कोटी डोसेसचं उत्पादनअन्य देशांकडूनही लसीला मागणी, पुनावाला यांची माहिती

सीरम इन्स्टिटयूटची कोविशिल्ड ही लस देशांतर्गत वापरासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ३ कंटेनर लोहगाव विमानतळाकडे रवाना झाले आणि पुण्यासह देशात एकच उत्साह आणि आनंदाचे वातावरण तयार झाले. केंद्र शासनाने केलेल्या घोषणेनुसार देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. त्याच धर्तीवर सीरम इन्स्टिटयूटच्या कोविशिल्ड लसीच्या उत्पादन व वितरणाने जोर पकडला आहे. दरम्यान, लसीचं वितरण सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी आनंद व्यक्त केला. तसंच तो आपल्यासाठी ऐतिहासिक क्षण होता असं म्हणत आता प्रत्येक देशवासीयांपर्यंत ही लस पोहोचवणं हे आपल्यासमोरील मुख्य आव्हान असल्याचंही ते म्हणाले. "हा आमच्यासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे की लसीचं आमच्या कंपनीतून वितरण होत आहे. देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत ही लस पोहोचवण्याचं आव्हान आमच्यासमोर आहे. २०२१ या वर्षातील आमच्यासाठी हे मुख्य आव्हान आहे. पाहूया हे कसं पूर्ण करता येईल," असं पुनावाला म्हणाले.  "भारत सरकारसाठी आम्ही त्यांच्या विनंतीवरून पहिल्या १० कोटी डोससाठी किंमत २०० रूपये निश्चित केली आहे. आम्ही सामान्य व्यक्ती, गरीब, आरोग्य सेवांशी निगडीत कर्मचाऱ्यांचा आदर करतो. यानंतर बाजारात ही लस १००० रूपयांना मिळणार आहे," असं पुनावाला यांनी सांगितलं. "भारत सरकारसाठी आम्ही योग्य किंमतीलाच ही लस पुरवणार आहोत. परंतु या लसीची किंमत २०० रूपयांपेक्षा जास्त असणार आहे, जो आमचा उत्पादन खर्च आहे. या लसीच्या विक्रीतून कोणताही नफा मिळवायचा नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे. पहिल्या दहा कोटी डोस सोबतच देश आणि केंद्र सरकारला आम्ही मदत करणार आहोत," असंही त्यांनी स्पष्ट केलं.  "अनेक देशांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान कार्यालयाला आपल्या देशांमध्ये सीरम इन्स्टिट्यूटच्या लसी पाठवण्यासाठी पत्र लिहिलं आहे. आम्ही प्रत्येकाची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु आपल्या देशाला आणि आपल्या देशातील नागरिकांच्या आरोग्याची काळजीदेखील घ्यायची आहे. आम्ही ही लस आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतही पाठवण्याचे प्रयत्न करत आहेोत. आम्ही सर्वच ठिकाणी काही ना काही करण्याचा प्रयत्न करत आहोत," असंही पुनावाला यांनी नमूद केलं. ७-८ कोटी डोसची निर्मिती"आपली कंपनी दर महिन्याला ७ ते ८ कोटी डोसेसची निर्मिती करत आहे. किती लसी भारतात वितरीत करायच्या आहेत आणि किती अन्य देशाना पाठवायच्या आहेत याचीदेखील तयारी सुरू आहे. आम्ही ट्रक, व्हॅन्स, कोल्ड स्टोरेजसाठीही काही जणांसोबत करार केले आहेत," असं पुनावाला म्हणाले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAmericaअमेरिकाSouth Africaद. आफ्रिकाPuneपुणेdelhiदिल्ली