शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

चीनी सैन्याची माघार; पण, 'या' महत्वाच्या ठिकाणावर तणाव तेवढाच, हाच आहे वादाचा 'खरा' मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 8:49 PM

कोर कमांडर स्तरावर झालेल्या 6 जूनच्या बैठकीत दोन्ही कडच्या सैनिकांनी मागे हटावे, असे ठरले होते. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, या बैठकीत तणावाच्या चार ठिकाणांवर चर्चा करण्यात आली. यात...

ठळक मुद्देएलएसी तणावाचा सर्वात मोठा मुद्दा फिंगर-4 हाच आहे. येथे मोठ्या संख्येने चीनी सैनिक तैनात आहेत. यापूर्वी भारतीय सैनिक फिंगर-8पर्यंत पेट्रोलिंगसाठी जात होते. मात्र, चीनी सैनिकांनी फिंगर-4जवळच रस्ता बंद केला आहे.6 जूनला झालेल्या बैठकीच्या आधारावर बुधवारी पुन्हा हायएस्ट कमांडर स्तरावरील बैठक होणार आहे.

नवी दिल्ली : पूर्वेकडील लडाखमध्ये लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल (LAC)वरील तणाव संपण्याच्या मार्गाने भारत आणि चीनने दोघांनीही पावले टाकली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ठिकानांवरून चीनी सैन्य मागे हटले आहे. आणि त्यांनी त्यांचे टेंटदेखील कमी केले आहेत. मात्र, फिंगर-4ची समस्या अद्यापही जैसेथेच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेगाँग त्सोजवळ फिंगर-4वरील तणाव कमी करण्यात वेळ लागू शकतो. कारण, चीनी सैन्य येथून मागे हटण्यास अद्याप तयार नाही. त्यामुळे तेथील तणाव अद्याप संपलेला नाही.

केवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं

कोर कमांडर स्तरावर झालेल्या 6 जूनच्या बैठकीत दोन्ही कडच्या सैनिकांनी मागे हटावे, असे ठरले होते. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, या बैठकीत तणावाच्या चार ठिकाणांवर चर्चा करण्यात आली. यात, पेंगाँग त्सो भागातील फिंगर-4, गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉइंट-14, पेट्रोलिंग पॉइंट-15 आणि हॉट स्प्रिंग एरिआ, यांचा समावेश होता. या बैठकीत निश्चित करण्यात आले होते, की तणावाशिवाय, इतर मुद्यांसंदर्भात लोकल कमांडर स्तरावर चर्चा केली जाईल. तेव्हा आशा व्यक्त करण्यात आली होती, की डेलिगेशन आणि हायएस्ट कमांडर लेव्हलवर चर्चेतून समस्या सुटू शकते. मात्र, फिंगर-4संदर्भात पूर्वीप्रमाणेच तणाव कायम आहे.

जाणून घ्या, काय आहेत पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले 'आमने-सामने'

चीनने बंद केला एरिआ -एलएसी तणावाचा सर्वात मोठा मुद्दा फिंगर-4 हाच आहे. येथे मोठ्या संख्येने चीनी सैनिक तैनात आहेत. यापूर्वी भारतीय सैनिक फिंगर-8पर्यंत पेट्रोलिंगसाठी जात होते. मात्र, चीनी सैनिकांनी फिंगर-4जवळच रस्ता बंद केला आहे. भारताचा दावा आहे, की एलएसी फिंगर-8जवळून जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ठिकानांवरून मागे हटण्याचे चीनचे पाऊल चर्चेचे वातावरण सकारात्मक राहावे यासाठी आहे. पण खरा तणाव तर फिंगर-4 वरच आहे.

जोरदार प्रत्युत्तर; भारतानं चीनच्या दिशेनं वळवली बोफोर्सची तोंडं, ड्रॅगनच्या नाकाखालून उडणार लढाऊ विमान

बुधवारी हायएस्ट कमांडर स्तरावरील बैठक -6 जूनला झालेल्या बैठकीच्या आधारावर बुधवारी पुन्हा हायएस्ट कमांडर स्तरावरील बैठक होणार आहे. यानंतर 8-10 दिवसांतच वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक कमांडर स्तरापासून ते डेलिगेशन स्तरापर्यंत बैठका होतील. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिंगर-4वरील तोडगा एवढ्या लवकर निघण्याची शक्यता नाही. यासाठी पुन्हा एकदा कोर कमांडर स्तरावरील बैठक बोलावली जाऊ शकते.

CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाchinaचीनIndiaभारतladakhलडाख