भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 05:07 PM2024-09-24T17:07:21+5:302024-09-24T17:15:01+5:30

मध्य प्रदेशातील दमोहमध्ये भीषण अपघात झाला आहे. ऑटो आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. त्यानंतर ऑटो ट्रकखाली आली. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

major accident in mp auto came under truck 7 people died | भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी

फोटो - आजतक

मध्य प्रदेशातील दमोहमध्ये भीषण अपघात झाला आहे. ऑटो आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. त्यानंतर ऑटो ट्रकखाली आली. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कटनी रोडवर हा अपघात झाला. माहिती मिळताच जिल्हाधिकारी (डीएम) आणि एसपीसह प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, सर्व जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात ट्रक चालकही जखमी झाला असून, त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालक दारूच्या नशेत होता की नाही याची अद्याप पुष्टी झालेली नाही. जखमींची ओळख पटलेली नाही कारण ते सध्या बोलण्याच्या स्थितीत नाहीत.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी तपास केल्यानंतर ते रुग्णालयात जातील. त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. तसेच जखमींच्या कुटुंबियांना फोन घेऊन माहिती दिली जाणार आहे. ते कोठून येत होते, याचाही शोध घेतला जाईल. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
 

Web Title: major accident in mp auto came under truck 7 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.