Gujarat Drugs Crime : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(Anti-Terrorism Squad) आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या संयुक्त कारवाईदरम्यान भारतीय तटरक्षक दलाने गुजरात किनारपट्टीजवळील आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ पाकिस्तानी नागरिकांना सुमारे 86 किलो ड्रग्जसह अटक करण्यात आले आहे.
भारतीय तटरक्षक दलाने ट्विटरवर पोस्ट करुन माहिती दिली की, गुजरात एटीएस आणि एनसीबीने समुद्रात रात्रभर केलेल्या कारवाईत पश्चिम अरबी समुद्रात एक पाकिस्तानी बोट पकडली, ज्यामध्ये 14 पाकिस्तानी क्रू मेंबर होते. त्यांच्याकडून 86 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. या मालाची किंमत सुमारे 600 कोटी रुपये आहे.
मार्चमध्येही ऑपरेशन करण्यात आलेनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने याआधीही गुजरात एटीएसच्या सहकार्याने 12 मार्च रोजी कारवाई केली होती. याबाबत माहिती देताना अधीक्षक सुनील जोशी यांनी सांगितले की, भारतीय तटरक्षक दल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ (IMBL) संयुक्त कारवाई केली. पोरबंदर किनाऱ्यापासून सुमारे 180 नॉटिकल मैल अंतरावर ड्रग्जची 60 पाकिटे घेऊन जाणारे जहाज जप्त करण्यात आले.
फेब्रुवारीमध्ये सर्वात मोठी कारवाई
फेब्रुवारी महिन्यात एनसीबी आणि भारतीय नौदलाने गुजरातच्या किनारपट्टीजवळ आजपर्यंतची सर्वात मोठी ड्रग्जची खेप पकडली होती. त्यावेळी संयुक्त कारवाईत 3 हजार 132 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते, ज्यांची किंमत 1000 कोटींहून अधिक होती. नौदलाने ते जहाज ताब्यात घेऊन पाच जणांना अटक केली.
हिंदी महासागरात नौदल आणि NCB अने अने मोठे ऑपरेशन्स
गेल्या दोन वर्षांत भारतीय नौदलाने NCB च्या सहकार्याने हिंदी महासागरात तीन मोठे ऑपरेशन्स केले आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये NCB आणि भारतीय नौदलाने गुजरात किनाऱ्याजवळ एक जहाज जप्त केले, ज्यामधून 2 क्विंटलपेक्षा जास्त मेथाम्फेटामाइन जप्त करण्यात आले. मे 2023 मध्ये NCB ने पाकिस्तानी जहाजातून किमान 12 हजार कोटी रुपयांचे 2500 किलो मेथॅम्फेटामाइन जप्त केले होते.