एकीकडे पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांसोबत सीमेवर तणाव आहे. तर दुसरीकडे भारत सरकार आपली लष्करी ताकदही वाढवण्याचे प्रयत्न करत आहे. दरम्यान, संरक्षण मंत्रालयानं १९ मार्च रोजी डिफेन्स पब्लिक सेक्टर अंटरटेकिंग कंपनी भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत मोठा करार केला आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार ४,९६० MILAN-2T अँटी चॅक गायडेड मिसाईलच्या पुरवठ्याबाबत हा करार करण्यात आला आहे. ही अँटी टँक गायडेड मिसाईल भारतीय लष्कराला सोपवण्यात येणार आहे. हा संपूर्ण करार १,११८८ कोटी रूपयांचा असल्याचंही सांगितलं जात आहे.
संरक्षण मंत्रालयानंदेखील याबाबत माहिती दिली. MILAN-2T हे मिसाईल भारत डायनॅमिक्स लिमिटेडद्वारे फ्रान्सच्या एका संरक्षण क्षेत्रातील कंपनीकडून मिळालेल्या लायसन्सच्या अंतर्गत विकसित केलं जात आहे. हे मिसाईल भारतीय लष्करात दाखल झाल्यानंतर लष्कराची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. भारत डायनॅमिक्सकडून सर्व ४,९६० MILAN-2T अँटी टँक गायडेड मिसाईल्स मिळण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी लागू शकतो.
MILAN-2T मिसाईलमधील महत्त्वाच्या बाबी
- MILAN-2T अँटी टँक गायडेड मिसाईल मॅन पोर्टेबल (Infantry) सेकंड जनरेशन ATGM आहे.
- स्फोटकांनी भरलेला टँकदेखील नष्ट करण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे. याद्वारे बंकर्सदेखील नष्ट केले जाऊ शकतात.
- MILAN-2T अँटी गायडेड मिसाईलची रेंज १८५९ मीटरपर्यंत आहे. हे मिसाईल फ्रान्सच्या MBDA मिसाईल सिस्टमच्या लायसन्स अंतर्गत भारत डायनॅमिक्स लिमिटेडद्वारे तयार करण्यात येणार आहे.
- MILAN-2T अँटी टँक गायडेड मिसाईल केवळ जमिनीवरूनच नाही तर व्हेईकल बेस्ड लाँचरमधूनही फायर केलं जाऊ शकतं.
- याचा वापर ऑफेन्सिव्ह किंवा डिफेन्स टास्कमध्ये अँटी टँक रोलमध्ये केला जातो.
मेक इन इंडियाला चालनाMILAN-2T अँटी टँक गायडेड मिसाईल लष्कराच्या ताफ्यात सामिल झाल्यानंतर लष्कराची ताकद अधिक वाढणार आहे. याशिवाय संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया मोहिमेला चालना मिळणार आहे. हा करार आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्रालयानं दिली.