जर तुम्ही आयकर परतावा भरणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयकर विभागाने नुकताच फॉर्म 26एएसमध्ये काही बदल केले आहेत. या बदलांमुळे आयकर परतावा भरणे आधीपेक्षा सोपे होणार आहे. (Form 26A changed of Income Tax Return)
खरेतर या 26AS फॉर्ममध्ये टीडीएस कपात(TDS) आणि उत्पन्नाच्या स्रोतावर कर गोळा (TCS) करण्याची माहिती द्यावी लागते. आता या फॉर्ममध्ये मालमत्ता आणि शेअर खरेदी-विक्रीची माहितीही द्यावी लागणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर आता करदात्याला या नव्या फॉर्ममध्ये सर्वच मोठे आर्थिक व्यवहार नमूद करावे लागणार आहेत.
यामुळे करदात्यांना आयटीआर फाईल करणे सोपे जाणार आहे. करदात्यांना फॉर्मच्या मदतीने त्यांनी केलेले व्यवहार लक्षात राहणार आहेत. यामुळे आयटीआर दाखल करताना त्यांच्याकडे आधीपासूनच अंदाज तयार राहणार आहे. आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2020 झाली आहे.
आयकर विभागाने लॉकडाऊन काळात म्हणजेच 8 एप्रिल ते 11 जुलैच्यामध्ये 21.24 लाख करदात्यांना 71229 कोटी रुपये परतावा दिला आहे. यामध्ये 24603 कोटी रुपयांचा व्यक्तीगत करदात्यांना परतावा देण्यात आला आहे. या करदात्यांची संख्या 19.79 लाख आहे. तर कंपनी कराअंतर्गत 1.45 लाख करदात्यांना 46,626 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जे परताव्याचे दावे आहेत ते प्राथमिकतेने सोडविले जात आहेत. हे दावे 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. करदात्यांना कोणत्याही समस्येशिवाय सेवा देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. याचबरोबर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना विनंती केली आहे. यासाठी त्यांनी परताव्याच्या वेगवान प्रक्रियेसाठी आयकर विभागाच्या ईमेलवर लगेचच उत्तर पाठविण्यास सांगितले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या....
Video: "सुशांतचा आत्मा स्वर्गात, त्याच्यासोबत महिलाही"; जगप्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्टचा दावा
ब्रिटन गेमचेंजर ठरणार! मृत्यूच्या दाढेतील कोरोनाबाधितांना वाचविले; स्टेरॉईडची चाचणी यशस्वी
राजस्थान सत्तासंघर्षावर पहिल्यांदाच वसुंधराराजेंची प्रतिक्रिया; गेहलोतांना थेट मदतीचा झालेला आरोप
चीन चवताळला! दक्षिण समुद्रात घुसलेल्या अमेरिकेला दिले चोख प्रत्यूत्तर
लॉकडाऊनमध्ये भविष्याची चिंता; लोकांची या सरकारी योजनेकडे 'उडी', तुम्हीही विचार करा...
अखेर पॉझिटिव्ह बातमी आली! सीरम इन्स्टिट्यूटला मोठा दिलासा; ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी यशस्वी