शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

१ जूनपासून होणार होणार 'हे' मोठे बदल; तुमच्या खिशावर थेट परिणाम, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 9:23 AM

दरमहिन्याच्या पहिल्या तारखेला देशात काहीतरी बदल होत असतात, ज्याचा परिणाम तुमच्या मासिक बजेटवर होतो.

मुंबई - मे महिना संपत आला आहे. जून महिना गुरुवारपासून सुरू होईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात काहीतरी बदल होत असतात. १ जूनपासून अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. त्यामुळे जून महिना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणते बदल होणार आहेत आणि त्यांचा तुमच्या बजेटवर कसा परिणाम होईल. एलपीजी सिलिंडरच्या किमती पेट्रोलियम कंपन्या बदलू शकतात.

इलेक्ट्रिक टू व्हीलर होणार महाग१ जूनपासून देशात इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणे महाग होणार आहे. म्हणजेच १ जूननंतर तुम्ही इलेक्ट्रिक बाइक किंवा स्कूटर खरेदी करायला गेलात तर तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागेल. २१ मे रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, अवजड उद्योग मंत्रालयाने FAME-II अनुदानाची रक्कम सुधारित केली आहे आणि ती १०००० रुपये प्रति kWh इतकी कमी केली आहे. त्याच वेळी, पूर्वी ही रक्कम १५००० रुपये प्रति किलोवॉट होती. यामुळे, बहुतेक इलेक्ट्रिक वाहने २५००० ते ३५००० रुपयांपर्यंत महाग होऊ शकतात.

रिझर्व्ह बँकेचे अभियान१ जूनपासून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील बँकांमध्ये जमा केलेल्या दावा न केलेल्या रकमेचा निपटारा करण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे. या मोहिमेला '१०० दिवस १०० पे'(100 Days 100 Pay) असे नाव देण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात बँकांना कळवले आहे. या मोहिमेअंतर्गत १०० दिवसांत १०० हक्क नसलेल्या रकमेचा निपटारा केला जाईल.

LPG घरगुती गॅसच्या दरात बदलसरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमती बदलतात. एलपीजी गॅसच्या किमती दर महिन्याच्या एका तारखेला निश्चित केल्या जातात. एप्रिल आणि मेच्या पहिल्या तारखेला १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. मात्र, १४ किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांपर्यंत कपात करण्यात आली होती.

CNG-PNG च्या किमती बदलू शकतातएलपीजी सिलिंडरप्रमाणेच सीएनजी-पीएनजीच्या किमतीही दर महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलतात. पेट्रोलियम कंपन्या दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये सीएनजी-पीएनजीच्या किमती बदलतात. एप्रिलमध्ये दिल्ली आणि मुंबईमध्ये सीएनजी-पीएनजीच्या दरात कपात करण्यात आली होती. १ मे रोजी फारसा बदल झाला नाही. अशा स्थितीत सर्वसामान्यांच्या नजरा एक तारखेकडे लागल्या असून सीएनजी-पीएनजीच्या दरात बदल होण्याची त्यांना अपेक्षा आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक