शीलेश शर्मा, नवी दिल्लीविधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांची मागणी जोरात सुरू झाली असून, मणिशंकर अय्यर, प्रिया दत्त यांच्यासह अनेक नेत्यांनी संघटनेत मोठे बदल करणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. पक्षात प्रचंड शैथिल्य आले असून, त्याला प्रमाुख्याने काँग्रेस नेतेच जबाबदार आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच सर्व राज्यांत पक्ष व संघटना मजबुत करायची असेल, तर भाजपाविरोधात जे पक्ष असतील, त्यांच्याशी समझोता करायला हवा, असाही मतप्रवाह पक्षात दिसत आहे.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आपली रणनीती बदलणार असून, प्रत्येक राज्यात निवडणूक समझोता केला जाईल. एवढेच नाही तर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस काहीही करण्यास तयार आहे. गरज पडल्यास महाराष्ट्रात शिवसेनेसोबत हातमिळवणी करण्यासही कचरणार नाही, असे काँग्रेसचे सरचिटणीस सी.पी. जोशी यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्यात यावेत
By admin | Published: March 17, 2017 12:50 AM