नवी दिल्ली : राष्ट्रनिर्मितीत महिलांचे मोठे योगदान असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. महिला सशक्तीकरणाची चर्चा आता इतिहासजमा झाली आहे. महिला स्वत:च शक्तीरूप आहेत. त्यामुळे महिलांच्या विकासाऐवजी त्यांच्या नेतृत्वात देशाच्या विकासाची चर्चा व्हायला हवी, असे ते म्हणाले.ते महिला लोकप्रतिनिधींच्या पहिल्या राष्ट्रीय संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. समाजातील कमकुवत घटकांमधील महिलांना सशक्त बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे आवाहनही त्यांनी महिला लोकप्रतिनिधींना केले.ते म्हणाले की, व्यवस्थापन क्षेत्रात बहुआयामी कार्यपद्धतीला (मल्टी टास्क) स्थान आहे. याचा अर्थ एकाच व्यक्तीत किती खुब्या असू शकतात. ही बहुआयामी कार्यपद्धती पाहता महिला या पुरुषांपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेत.
राष्ट्रनिर्मितीत महिलांचे मोठे योगदान -मोदी
By admin | Published: March 07, 2016 3:00 AM