Russia-Ukraine War:  रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतीय हवाई दलाचा मोठा निर्णय; ब्रिटनला लढाऊ विमाने पाठविणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 02:56 PM2022-02-26T14:56:00+5:302022-02-26T14:56:25+5:30

Russia-Ukraine War: युएनएससीमध्ये रशियाविरोधातील व्हिटोला भारताने पाठिंबा दिला नाही. हा धक्का ब्रिटन, अमेरिकेला पचलेला नसताना भारतीय हवाई दलाने आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

Major decision of Indian Air Force during Russia-Ukraine War; will not send fighter jets to Britain for Cobra Warrior 2022 | Russia-Ukraine War:  रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतीय हवाई दलाचा मोठा निर्णय; ब्रिटनला लढाऊ विमाने पाठविणार नाही

Russia-Ukraine War:  रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतीय हवाई दलाचा मोठा निर्णय; ब्रिटनला लढाऊ विमाने पाठविणार नाही

googlenewsNext

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. यामुळे भारतीय हवाई दलाने महत्वाचा निर्णय घेतला असून ब्रिटनमध्ये लढाऊ विमाने पाठविण्यात येणार नाहीत. या पावलामुळे ब्रिटन, अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे. 

युएनएससीमध्ये रशियाविरोधातील व्हिटोला भारताने पाठिंबा दिला नाही. हा धक्का ब्रिटन, अमेरिकेला पचलेला नसताना भारतीय हवाई दलाने आणखी एक मोठा धक्का दिला आहे. ब्रिटनमध्ये बहुदेशीय युद्धाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. कोब्रा वॉरिअर २०२२ हा युद्धसराव होणार होता. भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने या युद्धाभ्यासात भाग घेणार होती. 

Ukrainian Pilot Ghost of Kyiv: युक्रेनचा अभिनंदन वर्धमान! कीवच्या आकाशात एकटा घिरट्या घालतोय; रशियाची सहा विमाने पाडली

हवाईदलाने निर्णय घेत या युद्धसरावामध्ये भाग न घेण्याचे जाहीर केले आहे. कोबरा वॉरियर 2022 चे आयोजन ६ ते २७ मार्चपर्यंत करण्यात आले आहे. ब्रिटनच्या वेलिंग्टनमध्ये हा युद्धसराव होणार होता. भारतीय हवाई दलाने शनिवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे. हवाई दल या युद्धसरावासाठी पाच लढाऊ विमाने पाठविणार होती. हा निर्णय का घेतला हे हवाईदलाने स्पष्ट केलेले नाही. परंतू युक्रेनमध्ये युद्ध सुरु असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: Major decision of Indian Air Force during Russia-Ukraine War; will not send fighter jets to Britain for Cobra Warrior 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.