शहरं
Join us  
Trending Stories
1
निज्जर हत्याकांडात अमित शाह यांचे नाव? कॅनडाची अजित डोवालांसोबत सिक्रेट मिटिंग, दाव्याने खळबळ
2
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
3
Munawar Faruqui : आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
4
Baba Siddique : धक्कादायक! गुरमेल आणि झिशानची जेलमध्ये भेट; १० महिने एकत्र राहिले, चांगली मैत्री झाली अन्...
5
'फुलवंती' वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया आली का? प्राजक्ता म्हणाली, "हा माझा स्वभाव नाही की मी..."
6
Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी
7
मी पुन्हा येईन... कर्मचाऱ्याने असा काही राजीनामा दिला की, होईल २०१९ च्या निवडणुकीची आठवण
8
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
9
BSNL 5G : BSNLच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! २०२५च्या 'या' महिन्यापासून सुरू होणार 5G; सरकारनं काय म्हटलं?
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
11
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
12
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानला अतिरिक्त सुरक्षा; शुटिंगचे ठिकाण, फार्महाऊसवर नजर
13
लोणकर बंधूंकडून शूटर्सला पैशांचा पुरवठा, शस्त्रही दिले; पुण्याच्या डेअरीत बसून केले प्लॅनिंग
14
बाबा सिद्दिकी वांद्र्यातील रिअल इस्टेट किंग कसे बनले? असा सुरू झाला होता प्रवास
15
मी अल्पवयीन म्हणणारा निघाला २१ वर्षांचा! न्यायाधीशांच्या घरी भरले कोर्ट 
16
Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निकालानंतर Reliance Industries मध्ये घसरण
17
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
18
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
19
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी

KhelRatna: PM मोदींनी केली खेलरत्नचं नाव बदलण्याची घोषणा; CM योगींनी दिली अशी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 6:19 PM

Major Dhyan Chand Khel Ratna : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधानांच्या या घोषनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट केले आहे.

लखनौ - केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्काराला हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याची घोषणा केली आहे. यानंतर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधानांच्या या घोषनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट केले आहे. सुमारे 30 वर्षांपूर्वी हा पुरस्कार माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने सुरू करण्यात आला होता. (Major Dhyan Chand khel ratan award cm yogi adityanath expressed his gratitude to pm Narendra Modi says respect for the entire sports world)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या घेतलेल्या निर्णयावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "उत्तर प्रदेशात जन्मलेले हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद जी यांच्या नावाने खेलरत्न पुरस्काराचे नाव, हा असंख्य क्रीडाप्रेमींचा आणि संपूर्ण क्रीडा जगताचा सन्मान आहे. उत्तर प्रदेशच्या वतीने, आपले मनापासून आभार, आदरणीय पंतप्रधान जी!"

हा तर लक्ष भरकटवण्याचा डाव; काँग्रेसनं सांगितलं खेलरत्न पुरस्काराचं नाव बलण्यामागचं मोदींचं 'राजकारण'

मोदींचे ट्विट -"मला संपूर्ण भारतातील नागरिकांकडून खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद ठेवण्याबाबत आग्रह केला जात होता. लोकांच्या या भावनेचा सन्मान राखत, यापूढे खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद पुरस्कारने ओळखले जाईल, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.

काँग्रेसची प्रतिक्रिया -पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, माजी पंतप्रधान राजीव गांधी, हे देशाचे नायक आहेत. ते पुरस्कारासाठी नव्हे, तर त्यांच्या होतात्म्यासाठी, विचारांसाठी आणि आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी ओळखले जातात. राजीव गांधी या देशासाठी नायक होते, आहेत आणि राहतील. याच बरोबर, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रति व्यक्त करण्यात आलेल्या सन्मानाचे काँग्रेस स्वागत करते. मात्र, नरेंद्र मोदीजींनी क्षुल्लक राजकीय हेतूंसाठी त्यांचे नाव ओढले नसते तर बरे झाले असते. तथापि, आम्ही खेल रत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो,'' असेही सुरजेवाला म्हणाले.

“मेजर ध्यानचंद महान खेळाडू, हॉकीचे जादूगार होते, पण...”; संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदला -काँग्रेसने म्हटले आहे, की "आता आम्हाला आशा आहे की, देशातील खेळाडूंच्या नावावरच आणखी स्टेडियम आणि योजनांची नावेही ठेवली जातील. सर्वप्रथम नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदला, अरुण जेटली स्टेडियमचे नाव बदला. भाजप नेत्यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या स्टेडियम्सची नावं बदला. आता स्टेडियमचे नाव पीटी उषा, मिल्खा सिंग, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, अभिनव बिंद्रा, लिएंडर पेस, पुलेला गोपीचंद आणि सानिया मिर्झा यांच्या नावावर ठेवा.

खेलरत्न पुरस्काराचा इतिहास -खेलरत्न पुरस्काराची सुरुवात १९९१-९२ मध्ये झाली होती. तेव्हा या पुरस्काराचे नाव देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावावर ठेवले गेले होते. क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या पुरस्काराने गौरवण्यात येत होते. खेळाडूंना सन्मानित करून त्यांची प्रतिष्ठा वाढवणे, यासाठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला जात होता. मात्र आता हा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाणार आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशcongressकाँग्रेस