श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी टॅक्सी स्टँडवर ग्रेनेड हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सहा जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हा स्फोट इतका जोरदार होता की, शेजारी उभ्या असलेल्या अनेक वाहनांच्या काचा फुटल्या.
या घटनेनंतर सुरक्षा दलांने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोधमोहीम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य करायचे होते, पण यात सामान्य नागरिक जखमी झाले. अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरूजम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी बांदीपोराच्या सुंबल पुल परिसरात ग्रेनड हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या सहा जणांपैकी चार जणांचा बांदीपोरामध्ये उपचार सुरू आहे, तर दोन महिलांना श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे. घटनेनंर संपूर्ण परिसर रिकामा करण्या आला असून, मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाला तैनात करण्यात आलं आहे.
सुरक्षा दलाची कारवाई सुरुचजम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटना सुरक्षा दलाकडून राबवल्या जात असलेल्या कारवायांमुळे संतापल्या आहेत. दहशतवाद्यांनी यापूर्वी गैर-काश्मीरींना लक्ष्य केले होते. यामध्ये यूपी-बिहारमधून आलेल्या मजुरांचा समावेश आहे. त्याआधी पुंछमध्ये झालेल्या हल्ल्यात लष्कराचे सहा जवान शहीद झाले होते.