मोदी सरकारचा अवघ्या काही तासांत विस्तार होणार आहे. पण त्याआधी आतापर्यंत १२ केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. एकूण ४३ नव्या मंत्र्यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. पण सरकारमधील मोठ्या मंत्र्यांच्या राजीनामा सत्रानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
ठरलं!; मोदी मंत्रिमंडळ विस्तारात आज शपथ घेणाऱ्या ४३ मंत्र्यांची यादी जाहीर; महाराष्ट्राचा 'चौकार'
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात नेमकं कुणाकुणाला संधी मिळाली आहे याची नावं आता समोर आलेली असली तरी सरकारमधून डच्चू देण्यात आलेल्या मंत्र्यांचीच आता जास्त चर्चा होऊ लागली आहे. कारण प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, रमेश पोखरियाल अशा दिग्गज मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातून आतापर्यंत १२ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातीन दोन मंत्र्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील आयारामांची चांदी; काँग्रेस, राष्ट्रवादीतून आलेल्या तिघांना मोदी मंत्रिमंडळात संधी
केंद्रीय मंत्रिपदावरून राजीनामा दिलेल्या १२ जणांची यादी१. डी.व्ही.सदानंद गौडा२. रवीशंकर प्रसादर३. थवारचंद गेहलोत४. रमेश पोखरियाल निशंक५. डॉ. हर्षवर्धन६. प्रकाश जावडेकर७. संतोश कुमार गंगवार८. बाबुल सुप्रियो९. संजय शामराव धोत्रे१०. रतनलाल कटारिया११. प्रताप सारंगी१२. देबश्री चौधरी