शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
“विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
4
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
6
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
7
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
9
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
11
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
12
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
13
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
14
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
15
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
16
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
18
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
19
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

'या' राज्यात निवडणुकीपूर्वीच AAP ला मोठा झटका! प्रदेशाध्यक्ष, संघटन महामंत्र्यासह अनेक नेते भाजपत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 11:05 AM

"अरविंद केजरीवाल, पहाड आणि पहाडी आपल्या जाळ्यात अडकणार नाहीत."

नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच (Himachal Assembly Election) आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. आपचे हिमाचल प्रदेश अध्यक्ष आणि संघटन मंत्री यांनी भाजपत (BJP) प्रवेश केला आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत आपचे प्रदेशाध्यक्ष अनूप केसरी, संघटनेचे सरचिटणीस सतीश ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षात प्रवेश केला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करत दिली माहिती - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर ट्विट करत म्हणाले, "अरविंद केजरीवाल, पहाड आणि पहाडी आपल्या जाळ्यात अडकणार नाहीत. आम आदमी पक्षाच्या हिमाचल विरोधी धोरणां विरोधात, AAP चे हिमाचल प्रदेश अध्यक्ष अनुप केसरी, संघटनेचे सरचिटणीस सतीश ठाकूर आणि उना अध्यक्ष इक्बाल सिंग यांनी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मुख्य उपस्थितीत जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपत प्रवेश केला आहे. आपल्या सर्वांचे भाजप परिवारात स्वागत, अभिनंदन."

हिमाचलमध्येही होणार यूपीसारख्या विजयाची पुनरावृत्ती -ठाकूर यांनी पुढे लिहिले, उत्तर प्रदेशात आपली सर्वच जागांवर जमानत जप्त झाली. हिमाचलही याची पुनरावृत्ती करण्यास तयार आहे. विरोधकही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणावर आणि नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आहेत, कारण त्यांचा विश्वास, "सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास" या ब्रीदवाक्यावर आहे. 

भाजपाध्यक्ष हिमाचल दौऱ्यावर -भाजप अध्यक्ष जेपी नड्डा सध्या हिमाचल प्रदेशच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते अनेक संघटनात्मक आणि सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणार आहेत. पाच राज्यांतील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या जबरदस्त कामगिरीनंतर नड्डा यांचा हा पहिलाच राज्य दौरा आहे, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते अनिल बलूनी यांनी शुक्रवारी सांगितले. 

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपाHimachal Pradeshहिमाचल प्रदेशJ P Naddaजगत प्रकाश नड्डाAnurag Thakurअनुराग ठाकुरArvind Kejriwalअरविंद केजरीवाल