Kanchenjunga Express Train Accident West Bengal: पश्चिम बंगालमध्ये सोमवारी सकाळी एक मोठा रेल्वेअपघात झाल्याची बाब समोर आली. एका उभ्या असलेल्या एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या घटनेनंतर रेल्वेच्या मागील तीन बोगींचे मोठे नुकसान झाले. या अपघातात काही किमान पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. कांचनजंगा एक्सप्रेसला रंगपाणी ते निजाबारी दरम्यान हा अपघात झाला. सियालदहला जात असताना ही गाडी निजबारीसमोर उभी असताना पाठीमागून येणाऱ्या मालगाडीने भरधाव वेगात धडक दिली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रेल्वे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. रुळावरून बोगी हटवून अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कांचनजंगाच्या तीन बोगींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. रंगपाणी आणि निजबारी स्थानकादरम्यान हा अपघात झाला. ट्रेन नुकतीच न्यू जलपाईगुडीहून निघाली होती आणि किशनगंज मार्गे सियालदहला जात होती.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी एक टीम पाठवली आहे. अपघात एवढा भीषण होता की, एक ट्रेन दुसऱ्या ट्रेनवर चढली. या बोगींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बोगी गॅस कटरने कापून काढण्यात येत आहेत. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाकडून हेल्पलाइन नंबर जारी
कटिहार हेल्पलाइन नंबर1-090020419522-9771441956
कटिहार स्टेशन हेल्प डेस्क नंबर6287801805
न्यू जलपाईगुड़ी इमरजेंसी नंबर916287801758
कंचनजंगा ट्रेन अपघाताबाबत माहितीसाठी सियालदह स्टेशन वरील हेल्पलाइन नंबर033-23508794033-23833326
लम्बडिंग स्टेशन हेल्पलाइन नंबर0367426395803674263831036742631200367426312603674263858
गुवाहाटी स्टेशन हेल्पलाइन नंबर036127316210361273162203612731623