शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

पाच राज्यांच्या निकालानंतरही राज्यसभेत विरोधकांचेच बहुमत

By admin | Published: January 10, 2017 1:30 AM

पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. आगामी राजकारणाचे भवितव्य या निकालांमुळे ठरेल, असे बोलले जाते. प्रत्यक्षात पाच राज्यांचे निकाल

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीपाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. आगामी राजकारणाचे भवितव्य या निकालांमुळे ठरेल, असे बोलले जाते. प्रत्यक्षात पाच राज्यांचे निकाल काहीही लागले, तरी राज्यसभेत पुढले सव्वा वर्ष विरोधकांचे बहुमत कायम राहील. राजकीय समीकरणे बदलत नसल्याने, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातला संघर्ष अथे वाढतच जाण्याची चिन्हे आहेत. राज्यसभेत अवघे १0 सदस्य यंदा म्हणजे २0१७ मधे निवृत्त होत आहेत. त्यात पश्चिम बंगालचे ६, गुजराथचे ३ आणि गोव्याचा १ अशी वर्गवारी आहे. यापैकी एकमेव गोवा वगळता, उर्वरित ९ जागांवर भाजपाचे संख्याबळ वाढण्याची शक्यता नाही. गोव्याच्या जागेचे भवितव्यदेखील भाजपाला या राज्यात बहुमत मिळते की नाही, त्यावर अवलंबून आहे.पश्चिम बंगालच्या ६ पैकी ५ जागा सध्या तृणमूलकडे आहेत. विधानसभेत तृणमूलचे संख्याबळ लक्षात घेता, या जागा कायम राखण्याबरोबर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली जागाही तृणमूलच्याच पदरात पडेल. याखेरीज ६ व्या जागेवर माकपचे सीताराम येचुरी निवृत्त होत आहेत. काँग्रेसच्या सहकार्याने डावे पक्ष ही जागा सहज मिळवू शकतील. याचा अर्थ, बंगालच्या सर्व जागा विरोधकांकडेच राहणार आहेत. गुजरातच्या ३ जागांमध्ये भाजपाकडे २ तर काँग्रेसकडे १ जागा आहे. या ३ जागांमधे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व काँग्रेसच्या अहमद पटेलांचा समावेश आहे. गुजरात विधानसभेच्या संख्याबळानुसार उभय पक्षांच्या जागा कायम राहणार असल्याने, भाजपाच्या संख्येत इथेही वाढ होण्याची चिन्हे नाहीत. निवृत्त होणाऱ्या १0 सदस्यांमध्ये एकमात्र जागा गोव्याची आहे. गोव्यात लवकरच विधानसभेची निवडणूक आहे. ११ मार्च रोजी त्याचा निकाल आहे. यानंतर, बहुमताचे संख्याबळ ज्या पक्षाकडे असेल, त्या पक्षालाच या जागेचा लाभ होईल.संख्याबळ कितीतरी अधिक- राज्यसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असून, सभागृहात त्याचे ६0 सदस्य आहेत. भाजपाचे ५५ सदस्य आहेत.  - तथापि तृणमूल, डावे पक्ष, द्रमुक, समाजवादी, बसप, राजद, जनता दल (यु), जनता दल (एस) व काही छोटे पक्ष आणि अपक्ष भाजपाच्या कडवट विरोधात  असल्याने विरोधकांचे संख्याबळ इथे कितीतरी अधिक आहे. - विधानसभेची निवडणूक ज्या पाच राज्यांत आहे, त्यापैकी उत्तर प्रदेशच्या ३१ पैकी १0 जागांचे सदस्य पुढल्या वर्षी म्हणजे, एप्रिल २0१८ मधे आणि पंजाबच्या सर्व ७ जागांचे सदस्य २0२२ मधे निवृत्त होत आहेत.- उत्तर प्रदेशात पुढल्या वर्षी निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये सपाचे ६ सदस्य आहेत. त्यात नरेश अग्रवाल, जया बच्चन, किरणमय नंदा, आलोक तिवारी, दर्शनसिंग यादव व चौधरी मुनव्वरसिंग यांचा समावेश आहे. - बसपच्या दोन जागांपैकी एक स्वत: मायावतींकडे, तर दुसरी मुनकाद अलींची आहे. याखेरीज काँग्रेसचे प्रमोद तिवारी आणि भाजपाचे विनय कटियार असे आणखी दोन सदस्य आहेत.  - पुढल्या वर्षी या १0 जागांवर नवे सदस्य निवडून येतील. त्यात भाजपाला किती जागा मिळतील, हे निकालावर ठरेल. लोकसभेचा निवडणुकीपूर्वी पंजाबची एकही जागा रिक्त होणार नसल्याने, तिथे कोणताही बदल संभवत नाही. उत्तराखंडात पुढल्या वर्षी एप्रिल महिन्यात ज्या ३ जागा रिक्त होत आहेत, त्यापैकी एक जागा काँग्रेसची आहे.-  मणिपूरची एकमेव जागा चार वर्षांनी रिक्त होईल. थोडक्यात, सदस्यांच्या निवृत्तीमुळे ५ राज्यांच्या ४३ पैकी अवघ्या १२ जागा पुढल्या वर्षात म्हणजे, एप्रिल २0१८ मध्ये रिक्त होतील. संख्याबळाची ही आकडेवारी लक्षात घेता, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातला तीव्र संघर्ष सव्वा वर्ष तरी संपणार नाही.