मेक इन इंडिया सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी गिरगाव चौपाटीवरील महाराष्ट्र रजनीच्या व्यासपीठाला कार्यक्रम सुरू असतानाच आग लागली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण सुरू होते. या कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह बॉलीवूड कलाकार अमिताभ बच्चन आमीर खान यांची उपस्थिती होती.
मुंबईत १३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या मेक इन इंडिया कार्यक्रमाला सुरक्षा कवच देण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत.
स्वीडिश तंत्रज्ञानाचा वापर करून भारतात बनविलेल्या पर्यावरणपूरक व्होल्वो हायब्रिड बसचा स्वीडनचे पंतप्रधान स्टिफन लोवान आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलात लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
कलेचं जीवनातलं स्थान अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगताना माणसाला रोबो होण्यापासून वाचायचं असेल तर कलेला जवळ करायला हवं असं ते म्हणाले. माणसातली माणुसकी जपण्याचं काम कला करते त्यामुळे प्रत्येक शाळेनं मुलांच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये आर्ट गॅलरीला भेट देणं हा कार्यक्रम आवर्जून ठेवावा असा सल्ला मोदींनी दिला.
असहिष्णुतेवरून कलावंतांच्या पुरस्कार वापसीचे प्रकार मध्यंतरी जोरात सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मात्र कलावंतांच्या प्रतिष्ठित अशा बॉम्बे आर्ट सोसायटीच्या इमारतीचे उद्घाटन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
या सप्ताहात अंदाजे ३० देशांचे प्रतिनिधी व सुमारे २ हजार विविध औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
मेक इन इंडिया भारताचा सर्वांत मोठा ब्रॅंड असून यामध्ये रोजगार निर्मिती हेच मुख्य उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
यावेळी स्वीडनचे पंतप्रधान केजेल लॉफव्हेन फिनलँडचे पंतप्रधान जुहा पेट्री सिपिला राज्यपाल सी. विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवार केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक नेते आणि उद्योजक यावेळी उपस्थित होते.
देशाच्या उद्योग क्षेत्राला नवी झळाळी देण्याच्या उद्देशाने मुंबईत आयोजित केलेल्या मेक इन इंडिया सप्ताहाचे उद्घाटन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.