ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - भोपाळमधील तुरुंगातून पळून गेलेल्या सिमीच्या आठ दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले. या चकमकीवरून आता वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
ऑल इंडिया मजलीस ए इतहादूल मुसलिमीनचे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सिमीच्या आठ दहशतवाद्यांना चकमकीत ठार केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
भोपाळच्या तुरुंगात एवढी कडक सुरक्षा असताना सिमीचे आठ कार्यकर्ते पळून गेल्याने धक्काच बसला. तसेच, पळून गेल्यानंतर त्यांना थेट चकमकीत ठार करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाची योग्य आणि स्वतंत्र अशी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत असदुद्दीन ओवैसी यांनी यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले.
Very shocking that from high security central prison of Bhopal 8 alleged SIMI activists escaped: Asaduddin Owaisi, AIMIM on SIMI terrorists pic.twitter.com/OcIzJJTCT2— ANI (@ANI_news) October 31, 2016
A proper and independent investigation has to be done to know that how these accused flee from the high security prison: Asaduddin Owaisi pic.twitter.com/OSJexzROOC— ANI (@ANI_news) October 31, 2016