धर्मांतर बंदीचा कायदा करा
By admin | Published: November 22, 2015 11:16 PM
हिंदू अधिवेशनात ठराव : कायदा-सुव्यवस्थेचा बाऊ
हिंदू अधिवेशनात ठराव : कायदा-सुव्यवस्थेचा बाऊजळगाव : देशात धर्मांतर बंदीचे प्रमाण पाहता धर्मांतर बंदीचा सक्षम कायदा करुन त्याची अमलबजावणी करावी, विस्थापित हिंदूचे काश्मिरात सन्मानाने पुनर्वन करावे यासह सहा ठराव हिंदु जनजागृती समितीच्या प्रांतीय हिंदू अधिवेशनात रविवारी करण्यात आले. दुसर्या सत्रात गोरक्षा, मंदीर सुरक्षा, स्वसंरक्षण, लॅण्ड जिहाद व अश्लिलता या विषयावर चर्चा करण्यात आली.यावेळी निवृत्त जिल्हा न्यायाधिश सुधाकर चपळगावकर म्हणाले की, आपल्याकडे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा बाऊ केला जातो. त्याच्या नावाखाली ओडीसा, ब्रदीनाथ, रथयात्रा, केदारनाथ व कुंभमेळा अशा मिरवणुकांना विरोध केला जातो. अनिल अर्डक (औरंगाबाद) यांनी मंदीरे ही शासनाच्या अधीन असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो व त्याचा पैसा अल्पसंख्यांकाच्या विकासासाठी वापरला जातो असा आरोप केला. सुरेश कुळकर्णी यांनी अनधिकृत भोंग्याबाबत कायदेशीर सल्ला दिला. स्वामी प्रज्ञासिंह, स्वामी असिमानंद व आसाराम बापु यांची शासनाने त्वरीत मुक्तता करावी, कॉन्व्हेंट शाळांवर बंदी घालावी घुसखोरांना बांग्लादेशात परत पाठवावे आदी ठराव यावेळी करण्यात आले.