नागपूर : अयोध्या येथील वादग्रस्त जागेवर राममंदिरच व्हावे, यासाठी विश्व हिंदू परिषद आग्रही आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी हा मुद्दा चर्चेद्वारे सोडविण्यात यावा, असा अभिप्राय दिला. राममंदिराच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाने कायदाच बनवावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली आहे.विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी यासंदर्भात पत्रक जारी केले. १९९१मध्ये विहिंप व बाबरी अॅक्शन कमिटीमध्ये चर्चा झाली होती. मात्र, विहिंपने मंदिर असल्याचे पुरावे सादर केल्यानंतर कमिटीचे लोक बैठकीला आलेच नाहीत. न्यायालयातदेखील हे पुरावे सादर करण्यात आले आहेत. संविधानिक पद्धतीने मंदिर निर्मिती करायची असेल तर केंद्राने कायदा बनवून तो संसदेत मंजूर करून घ्यावा, अशी मागणी तोगडिया यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
राममंदिरासाठी कायदा बनवावा : विहिंपची मागणी
By admin | Published: March 22, 2017 2:16 AM