ऑनलाइन लोकमत -
वडोदरा, दि. २४ - जातीय संघर्ष टाळण्यासाठी आणि सलोखा वाढवण्यासाठी गोहत्येवर देशभरात बंदी आणण्याची गरज आहे. तसंच प्रत्येकाने भारत माता की जय म्हणावं यासाठी कायदादेखील बनवण्यात यावा असं योगगुरु बाबा रामदेव बोलले आहेत. वडोदरा येथे विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
आपल्या संविधानात भारत माता की जय बोललं पाहिजे असं कुठे लिहिलं नसलं तरी कोणालाही ते बोलण्याची समस्या नसावी. त्यामुळे कायद्यात तशी तरतूद करण्याच यावी जेणेकरुन प्रत्येकजण बोलू शकेल असं मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केलं आहे. देशभरात गोहत्येबर बंदी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी यावेळी विनंतीदेखील केली. तसंच काँग्रेस नेते शशी थरुर यांनी कन्हैय्या कुमारची तुलना शहीद भगतसिंग यांच्याशी केल्याबद्द्ल त्यांच्यावर टीका केली. आपल्या देशासाठी प्राणांची आहुती देणा-या शहीदांचा हा अपमान असल्याचं बाबा रामदेव बोलले आहेत.