शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

न्यूक्लिक अ‍ॅसिड अ‍ॅम्प्लीफिकेशन टेस्ट अनिवार्य करा

By admin | Published: August 01, 2014 3:56 AM

ड्रग अ‍ॅण्ड कॉस्मेटिक कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी गुरुवारी राज्यसभेत केली.

विजय दर्डा यांची मागणी : तोपर्यंत लोकांना आरोग्य सेवेचा खरा लाभही मिळणार नाही दिल्ली : ड्रग अ‍ॅण्ड कॉस्मेटिक कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी गुरुवारी राज्यसभेत केली. जोपर्यंत रक्त आदान (ट्रान्सफ्युजन) सेवा अधिक चांगली होणार नाही तोपर्यंत लोकांना आधुनिक आरोग्य सेवेचा खरा लाभही दिला जाऊ शकणार नाही, असे विजय दर्डा म्हणाले. रुग्णांना प्रभावी रक्त आणि दुसरे घटक उपलब्ध करून देणे, हा आमचा उद्देश असायला पाहिजे. सुरक्षितता आणि एखाद्या रुग्णाची गरज म्हणून ते पुरेसे आहे. अलीकडच्या काळात या क्षेत्रात प्रचंड बदल झालेले आहेत. त्यामुळे ड्रग्स अ‍ॅण्ड कॉस्मेटिक कायद्यात दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. परंतु आजही जुन्या पारंपरिक मानवी रक्त व रक्त घटकांंच्या व्यवस्थेला लायसन्स देण्याचा क्रम सुरूच आहे. त्यात आधुनिक आणि सुरक्षित रक्त घटकांचा समावेश करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.टीटीआय, उदाहरणार्थ एचआयव्ही-१ आणि २, हेपेटायटिस-बी, सी, मलेरिया सिफलिसची पारंपरिक पद्धतीने तपासणी करावी, अशी कायद्यात तरतूद आहे. सरकारच्या कायद्यात जी व्यवस्था आहे, त्यात पारंपरिक प्रणालीअंतर्गत रक्त देतेवेळी घातक आजाराच्या संक्रमणाची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे. रक्तदानातून होणाऱ्या संक्रमणाचे प्रमाण ३.५ टक्के एवढे आहे. याउलट रक्तदान करणारे केवळ २ ते २.५ टक्के लोक एचआयव्ही आणि एचसीव्हीने बाधित असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसते, असे दर्डा यांनी यावेळी स्पष्ट केले.न्यूक्लिक अ‍ॅसिड अ‍ॅम्प्लीफिकेशन टेस्ट आधुनिक प्रणाली असल्याचे स्पष्ट करून विजय दर्डा म्हणाले, जगातील सर्व विकसित आणि विकसनशील देशांत ही चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. रक्तातून होणारे संक्रमण समाप्त करण्यासाठी आम्ही भारतातही ही चाचणी अनिवार्य केली पाहिजे. परंपरागत पद्धतीने करण्यात आलेल्या चाचण्यांत रक्त संक्रमण झाल्याचे दिसत नाही. परंतु न्यूक्लिक अ‍ॅसिड अ‍ॅम्प्लीफिकेशन टेस्टद्वारे करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये मात्र रक्त संक्रमण झाल्याचे स्पष्ट दिसले. एक युनिट रक्त तीन रुग्णांना रेड सेल्स, प्लाज्मा आणि प्लेटलेटमुळे संक्रमित करू शकते, ही चकित करणारी बाब आहे. याच कारणामुळे भारतात न्यूक्लिक अ‍ॅसिड अ‍ॅम्प्लीफिकेशन टेस्ट कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य करण्याची माझी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)