नवी दिल्ली: लोकांचं आयुष्य वाचवणं आणि त्यांची उपजीविका सुरळीत राहणं याला प्राधान्य द्या. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असू द्या, अशा स्पष्ट सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्य सरकारांना केल्या आहेत. आता आपल्याकडे कोरोनावरील लस उपलब्ध आहे. पण त्यासोबतच प्रतिबंधात्मक सूचनांचंदेखील पालन करा, असं आवाहन पंतप्रधांनी देशवासीयांना केलं. (make people aware about covid precautions pm narendra modi appeals to youths)लॉकडाऊन टाळायचाच प्रयत्न करा, तो शेवटचा पर्याय असू दे; पंतप्रधानांची राज्य सरकारांना स्पष्ट सूचनापंतप्रधान मोदींनी देशवासीयांशी संवाद साधताना तरुण वर्गाला विशेष आवाहन केलं. या कठिण समयी अनेकांनी पुढाकार घेत सामाजिक कार्य केलं. गरजूंना जेवण, औषधं पुरवली. त्यांच्या राहण्याची सोय केली. त्या सगळ्या व्यक्तींचा, संस्थांचा मी आभारी आहे, असं मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी देशातल्या तरुणांना एक विशेष आवाहन केलं. तरुणांनी पुढाकार घेऊन स्थानिक पातळीवर समित्या स्थापन कराव्या. या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक नियम याबद्दल जनजागृती करावी. लोकांना लसीकरणाची माहिती द्यावी. तरुणांनी अशा प्रकारे पुढाकार घेतल्यास आपल्याला कंटेन्मेंट झोनची, लॉकडाऊनची गरजच भासणार नाही, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
PM Modi: ...तर लॉकडाऊनची गरजच भासणार नाही; मोदींनी तरुणांवर सोपवली मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 9:23 PM