नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. आता व्हॉट्सअॅपवररेल्वेचे लाइव्ह स्टेट्स किंवा 10 अंकांचा पीएनआर नंबर तुम्हाला पाहता येणार आहे. सध्या प्रवाशांना पीएनआर स्टेटस पाहण्यासाठी रेल्वेच्या 139 नंबरवर कॉल करावे लागते. याशिवाय, IRCTC च्या वेबसाइटवर चेक करावे लागते. यासाठी प्रवाशांना अडचणी येत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. दरम्यान, यावर उपाय म्हणून भारतीय रेल्वेने सध्या ऑनलाइन ट्रॅव्हल वेबसाइट 'MakeMyTrip' सोबत भागिदारी केली आहे. यामध्ये प्रवाशांना त्यांच्या स्मार्टफोनवर पीएनआर स्टेटस, लाइव्ह ट्रेन स्टेटस आणि रेल्वेसंबंधी माहिती मिळणार आहे.
सर्वात आधी आपल्याकडे काय पाहिजे...1) तुमच्या स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट व्हर्जनचे व्हॉट्सअॅप पाहिजे.2) स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्शन पाहिजे.3) ट्रेनचा नंबर आणि पीएनआर नंबर पाहिजे.
या स्टेप्स फॉलो करा...1) तुमच्या स्मार्टफोनमधील ‘Dialer’ अॅप ओपन करा.2) ‘7349389104’ (मेकमायट्रिप व्हॉट्सअॅप) हा नंबर डायल करा आणि आपल्या कॉन्टेक्ट्स लिस्टमध्ये अॅड करा. 3) नंबर सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करा आणि कॉन्टॅक्ट लिस्ट रिफ्रेश करा. 4) लाईव्ह ट्रेन स्टेटस पाहण्यासाठी ट्रेनचा नंबर पाठवा आणि तुमच्या पीएनआर स्टेटस पाहण्यासाठी पीएनआर नंबर पाठवा.5) यानंतर मेकमायट्रिप आपल्याला ट्रेनचा रियल टाइम स्टेटस किंवा पीएनआरचे बुकिंह स्टेटस पाठवेल.
* मेकमायट्रिप आपल्याला रिस्पॉन्ड नाही देणार नाही, जोपर्यंत तुम्ही पाठविलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजवर निळ्या रंगाचे टिकमार्क पाहत नाही.