ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द केल्याच्या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बँकेत रांग लावून आपला निषेध नोंदवला असताना आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदींवर आरोप केले आहेत. '500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द करण्यामाने एनडीए सरकारचा मोठा घोटाळा असून या निर्णयाबाबत भाजपा मंत्र्यांना आणि काही मोजक्या लोकांना आधीच माहिती देण्यात आली होती', असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
'काही दिवसांपुर्वी भ्रष्टाचाराविरोधात लढण्याच्या नावाखाली मोठा घोटाळा करण्यात आला आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा निर्णय जाहीर केला तेव्हा ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्या सर्व मित्रांना त्यांना फोन करुन आधीच सांगून ठेवलं होतं', असं अरविंद केजरीवाल बोलले आहेत.
'खूप सारा पैसा पुन्हा परत येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्याच्या नावाखाली फक्त पैसा एका हातातून दुस-या हातात नेला जाणार आहे. यासाठी सर्वसामान्यांना वेठीस धरुन त्रास दिला जात आहे', असंही केजरीवाल बोलले आहेत.
Jab PM ne ailaan kiya, uske pehle apne saare doston ko satark kar diya jinke pas kaala dhan hai,unhone apna maal thikane laga diya: Kejriwal pic.twitter.com/yk8sEcpy7M— ANI (@ANI_news) 12 November 2016
'काळा पैसा डिपॉजिट करणा-यांना टॅक्स आणि 200 टक्के दंड भरावा लागेल असं सरकारने सांगितलं आहे. याचा अर्थ 90 टक्के रक्कम जाणार आहे. एवढे पैसे जातील माहित असतनाही कोण पैसे डिपॉजिट करेल ? काळा पैसा लपवलेल्यांना पैसे डिपॉजिट करु नका असं सरकार अप्रत्यक्षपणे सांगत आहे', असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
We are questioning Government's intent, their intention is wrong: Arvind Kejriwal,Delhi CM pic.twitter.com/5MKnkpfZle— ANI (@ANI_news) 12 November 2016