पुरी : वाळूपासून कलाकृती करणारे प्रसिद्ध कलाकार सुदर्शन पटनायक यांनी नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ओडिशात पुरी येथे वाळूचे शंभर रथ बनवून त्यांनी केलेल्या विक्रमाची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डसने दखल घेतली आहे. याबाबत बोलताना पटनायक म्हणाले की, मला लिम्का बुक आॅफ रेकॉर्डकडून रेकॉर्ड नोंदला गेल्याची माहिती देण्यात आली आहे. पद्मश्रीने सन्मानित केलेल्या पटनायक यांनी यापूर्वी २० रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदविलेले आहेत. (वृत्तसंस्था)मान्यवरांकडून शुभेच्छा भगवान जगन्नाथाच्या वार्षिक रथयात्रेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि बॉलीवूडचे स्टार अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. पुरीत येतात लाखो भाविक भगवान जगन्नाथाच्या प्रसिद्ध रथयात्रेसाठी देश विदेशातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. नउ दिवस चालणाऱ्या या उत्साहात अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची रथयात्रा पाहण्यासाठी भाविक येथे दरवर्षी येतात. विद्यार्थ्यांनीही केली मदत दरवर्षी ते रथयात्रेच्या दरम्यान कलाकृती तयार करतात. यंदा १०० रथ बनविण्यासाठी २५०० वर्ग फूट भागात वाळूच्या ८०० बॅग लागल्या. तीन दिवसात २० तासात हे काम पूर्ण करण्यात आले. त्यांच्या संस्थेच्या २५ विद्यार्थ्यांनीही यासाठी मदत केली.
वाळूचे शंभर रथ बनवून नवा जागतिक विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2016 4:00 AM