नवी दिल्ली- मालदीवमधील राष्ट्रपती निवडणुकीतील निकाल हा चीनसाठी धक्कादायक होता. सत्ताधारी असलेल्या अब्दुल्ला यामीन यांचा पराभव होऊ शकत नाही, अशीच अटकळ बांधली जात होती. परंतु विरोधी पक्षाचे उमेदवार इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी त्यांचा पराभव करत विजय मिळवला. मालदीवमध्ये अब्दुल्ला यामीन यांच्या पराभवानं एक प्रकारे चीनलाही धक्का बसला आहे. विशेष म्हणजे यातून भारताला नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. यामीन हे चीनच्या फारच जवळ होते आणि ते गेल्या काही दिवसांपासून भारतासोबत फटकून वागत होते. परंतु आता सोलिह यांच्या विजयानं भारताच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.गेल्या दोन वर्षांपासून हिंद महासागरात भारताचा शेजारी असलेल्या मालदीवशी चीनमुळे भारताचे संबंध ताणले गेले होते. मालदीवमधल्या निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा द्विपक्षीय संबंध प्रस्थापित होण्याची आशा निर्माण झाली आहे. अमेरिका आणि श्रीलंकेबरोबरच भारतानं मालदीवमधल्या नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातूनच भारतानं कूटनीतीक संदेशही दिला आहे. मालदीवला शुभेच्छा देत भारतानं एक प्रकारे चीन आणि अब्दुल्ला यामीनला कडक इशारा दिला आहे.विशेष म्हणजे मालदीवमधल्या जनतेलाही हे निवडणूक निकाल धक्का देणारे आहेत. कारण विरोधी पक्ष आणि सालेह समर्थकांनी निवडणुका प्रभावित केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गेल्या वर्षी यामीन सरकारनं भारताबाबत टोकाचा विरोध दर्शवला होता. चीनबरोबर करारांवर करार करत सुटलेलं यामिन सरकार हे हिंद महासागरातही भारतासाठी डोकेदुखी ठरत होते.भारतातले मालदीवचे राजदूत अहमद मोहम्मद म्हणाले, ब-याच आपण एकमेकांवर आरोप करत असतो, हे इतिहासातून पाहायला मिळतं. परंतु आपला लोकशाहीवर विश्वास आहे. निवडणुकीचा निकाल मनासारखा लागला नसला तरी त्याचा सन्मान करणं गरजेचं आहे. राष्ट्रपती मोमून अब्दुल गय्यूम यांनी 30 वर्षांपर्यंत देशात शासन केलं. त्यांनीच लोकशाही पद्धतीनं निवडणूक होण्याची व्यवस्था केली. मोहम्मद यांना यामिनचे जवळचे समजले जाते. लवकरच ते मालदीवमध्ये परतून विरोधी पक्षाची भूमिका निभावतील.दरम्यान, माजी राष्ट्रपती नशीद यांनी भारताचे आभार प्रदर्शन केलं आहे. नशीद म्हणाले, श्रीलंका आणि मलेशियातील देशांची परिस्थिती पाहता चीनला आता समजलंच असले की असं का झालंय. मालदीवमधलं नवं सरकार यामीनच्या कार्यकाळात सुरू झालेल्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्चं पुन्हा ऑडिट करेल. नशीद यांनी चीनवर जमीन हडपण्यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत.
चीनवर नियंत्रण ठेवणं झालं सोपं, यामिनच्या पराभवामुळे भारतासाठी उघडलं मालदीवने दार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 1:26 PM