बंगळुरू : काँग्रेसने बराच काळ प्रतीक्षा करायला लावून कर्नाटकमधील १८ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, वीरप्पा मोईली आदी महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.राज्यात मित्रपक्षांशी जागावाटपात काँग्रेसच्या वाट्याला २० जागा आल्या आहेत. बंगळुरूमधून कोणाला तिकीट देणार हे भाजपाप्रमाणे काँग्रेसनेही अद्याप जाहीर केलेले नाही. हुबळी-धारवाड येथील काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. काँग्रेसचा मित्रपक्ष जनता दल सेक्यूलर (जेडीएस) हा आठ जागा लढवतआहे. काँग्रेसने राज्यातील आपल्या विद्यमान १० पैकी ९ खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तुमकूर येथील काँग्रेस खासदार मुद्दहानुमेगौडा यांचा मतदारसंघ जेडीएसकडेगेल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही.वीरप्पा मोईली (चिक्कबल्लारपूर) यांना पुन्हा त्यांच्याच मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. बंगळुरू मध्य या मतदारसंघातून विद्यमान आमदार रिझवान अर्शद हे भाजपा उमेदवार पी. सी. मोहन यांचा सामना करतील. कर्नाटकातील काँग्रेस लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत वीणा कशप्पनवार या एकमेव महिला उमेदवार आहेत.
मल्लिकार्जुन खरगे, वीरप्पा मोईलींसह कर्नाटकात काँग्रेसचे १८ उमेदवार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 12:20 AM