काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर रिंगणात; त्रिपाठींचा अर्ज बाद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 09:25 AM2022-10-02T09:25:59+5:302022-10-02T09:26:59+5:30
खरगे यांनी १४ अर्ज भरले होते; तर थरूर यांनी पाच व त्रिपाठी यांनी एक अर्ज भरला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी झारखंडचे माजी मंत्री के. एन. त्रिपाठी यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज शनिवारी छाननीत बाद झाला. त्यामुळे आता मल्लिकार्जुन खरगे व शशी थरूर हे दोघेच रिंगणात उरले आहेत.
पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, उमेदवारी अर्जांची शनिवारी छाननी करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान एकूण २० अर्ज प्राप्त झाले. त्यातील चार बाद ठरले. सह्यांची पुनरुक्ती किंवा सह्या जुळत नसल्याने ते फेटाळावे लागले. खरगे यांनी १४ अर्ज भरले होते; तर थरूर यांनी पाच व त्रिपाठी यांनी एक अर्ज भरला होता. त्रिपाठी यांच्या एका सूचकाची स्वाक्षरी जुळली नाही, तर अन्य एका सूचकाच्या सहीची पुनरुक्ती झाली होती. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"